वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला ...(२)
रे प्रितीच्या फुला ||
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला || 1 ||
मृगाजळाच्या तरंगात
नभाच्या निळ्या रंगात
चल रंगु सारंगात सारंगात
चल रंगु सारंगात
माझ्या प्रितीच्या फुला ...(3)
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला