लटपट लटपट तुझ चालण ग मोठ्या नखर्याच
चालण ग मोठ्या नखर्याच
बोलण ग मंजुळ मैनेच ...(२)
नारी ग नारी ग
नारी ग ...(३)
लटपट लटपट तुझ चालण ||
कांती नव नव तिची ...(२)
दिसे चंद्राची प्रभा ढवळी
जाईची निमिल कवळी ...(2)
दिसणार सुकुमार नरम गाल वट पवळी ...(2)
जशी चवळीची शेंग कवळी ...(२)
दिसणार सुकुमार नरम गाल वट पवळी
तारुणपन अंगात सोस मदनाच जोराच || 1 ||
चालण ग मोठ्या नखर्याच
बोलण ग मंजुळ मैनेच ...(२)
नारी ग ...(३)
लटपट लटपट तुझ चालण