दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
कोवाळ्या गुलाबाची पाकळी दवाची
झेलताना तोल गेला काळजाला भार झाला ||
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
डोळे माझे भिरभिरले मोर पापण्यांचे लाजले
चांदरात फुलांच्या सांजवाती
स्पर्ष अमृताचे छेडले
बावर्या निखार्याची आग ही उराशी
सोसताना श्वास ओला केशराचा गंध आला || १ ||
दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा ...(२)