Showing posts with label re. Show all posts
Showing posts with label re. Show all posts

Tuesday, June 9, 2009

Lyrics Phulale/Fulale Re Kshan Majhe/Maze

गीत : नितीन आखवे
संगीत : श्रीधर फडके
गायिका : आशा भोसले


फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने
सजले रे क्षण माझे सजले रे ||

झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले
साजण स्पर्षाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने
खुलले रे क्षण माझे खुलले रे ||

ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मन मोराचे, मनमोराचे, जादुभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने
हसले रे क्षण माझे हसले रे ||

रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने
भुलले रे क्षण माझे भुलले रे ||

Monday, June 8, 2009

Lyrics Nach Nachuni Ati Mi/Mee Damale (नाचनाचुनी अति मी दमले)

चित्रपट : जगाच्या पाठीवर (१९६०)
गीत : ग. दि, माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
गायिका : आशा भोसले


नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला ! || ध्रु ||

निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची, कंठि घातली माला || १ ||

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला-गेला || २ ||

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठुन गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला || ३ ||


English Version :

Nach nachuni ati mi damale
thakale re nandalaal ! ||

Nilajarepana katis nela, nisugapanacha shela
Aatmastutiche kundan kani, garv jadavila bhala
Upabhoganchya shatak malanchi, kanthi ghatali malaa || 1 ||

Vishaynasana vaje vina, atrupti de tala
Anay aniti napur payi, kusangati kartaala
Lobhe pralobhan naani feki, majvar aala gela || 2 ||

Swata bhovati gheta girakya, andhapana ki aala
Talaacha maj tol kalena, saadhi gothun geli
Andhari mi ubhi aandhali, jiv jivana bhyala || 3 ||

Wednesday, May 20, 2009

Lyrics Door/Dur Kinara Rahila (दूर किनारा राहिला )

दूर किनारा राहिला
बेभान वारा धावला
माझी रे हो माझी रे …(२) || ध्रु ||

तूफानी लाटांनी दर्याच्या काठांनी
बेधुंद झाली जिंदगी
उदास होउनी असा मी धावुनी
केली प्रभूची बंदगी
या जलधारा जीवनधारा ...(२)
हो माझी रे || १ ||


English Version :


Dur kinara rahila
Bebhan wara dhawala
Majhi re ho majhi re …(2)

Tufani latani daryachya kathani
Bedhunda jhali jindagi
Udas houni Asa mi dhawuni
Keli prabhuchi bandagi
Ya jaladhara jeevandhara 2
Ho majhi re || 1 ||

Thursday, April 30, 2009

Lyrics Udhalit Ye Re Gulal Sajana

उधळीत ये रे गुलाल सजणा
तू श्याम मी राधिका ...(२)
तुला शोधू कशी झाली वेडीपिशी ...(२)
तू ये ना मज ने ना
अरे ये ना कान्हा
उधळीत ये रे गुलाल सजणा
तू श्याम मी राधिका

चाँद बिलोरी रात अधिरी
प्रीत माधुरी तू देऊन जा
धुंद होउनी रात खेळुनी
पुनवेच्या राती मला घेउन जा
हो रंग आला अती वाट पाहू किती ...(२)
तू ये ना मज ने ना
अरे ये ना कान्हा
उधळीत ये रे गुलाल सजणा
तू श्याम मी राधिका ...(2)

Wednesday, April 29, 2009

Lyrics De na re punha punha

दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
कोवाळ्या गुलाबाची पाकळी दवाची
झेलताना तोल गेला काळजाला भार झाला ||

दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा

डोळे माझे भिरभिरले मोर पापण्यांचे लाजले
चांदरात फुलांच्या सांजवाती
स्पर्ष अमृताचे छेडले
बावर्या निखार्याची आग ही उराशी
सोसताना श्वास ओला केशराचा गंध आला || १ ||

दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा

पुन्हा पुन्हा ...(२)
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥