गीत : नितीन आखवे
संगीत : श्रीधर फडके
गायिका : आशा भोसले
फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने
सजले रे क्षण माझे सजले रे ||
झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले
साजण स्पर्षाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने
खुलले रे क्षण माझे खुलले रे ||
ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मन मोराचे, मनमोराचे, जादुभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने
हसले रे क्षण माझे हसले रे ||
रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने
भुलले रे क्षण माझे भुलले रे ||