वसईच्या गाडीने बिगीबिगी चालीने
दारात तुमच्या आली...
आली मुंबईची केळेवाली ...(२)
आली मुंबईची केळेवाली ...(२) ||
माझ्या केळ्यांचा रंगच न्यारा
ज्याने खाल्लय तेला इचारा ...(२)
खड़ी साखरेचा जणू हाय गोट
वर मधाच लावालया बोट ...(२)
पुन्हा मिळायची न्हाय मी गावायाची न्हाय
माझ लगिन हाय म्होरल्या साली || १ ||
आली मुंबईची केळेवाली ...(२)
हिरव्या साडीच्या पदाराखाली
गोड काया ही रसरसलेली ...(२)
नार पाहून नखरेवाली
काहो मनाची उलघाल झाली ...(२)
नका घेऊ तशी बघा दाबुन अशी
आहे म्हणुन पाटित खाली || २ ||
आली मुंबईची केळेवाली ...(२)
भर ज्वानिने भरलया केळ
त्याचा इश्काशी जमलाय मेळ ...(२)
पूरा झालाय नजरेचा खेळ
आता कशाला लावाताय येळ ...(२)
नका जावा रुसून खावा येथे बसून
केळी देतेया सोलून साली ||३||
आली मुंबईची केळेवाली ...(२)