Tuesday, November 12, 2024

Faraal chalu aahe

आपल्या घरात शांततेत खमंग फराळ होण्या साठी काही टिप्स...

 या वेळी गृहिणींचा मूड हा सेन्सेक्स सारखा  उतार चढाव असा होत असतो....

*शांतता... फराळ सुरु आहे...!*🫣


बायको फराळ करत असतांना सोफ्यावर पाय पसरून मॅच बघू नका ..

मोबाईल शक्यतो लांब ठेवा , रिल्स बघण्याची तर हा वेळ अजिबातच नाही ....धोका पत्करू नका ...

एका जागेवर जास्त वेळ बसू नका या मुळे आपण काहीच काम करत नाही हे लक्ष्यात आल्यास एखादे काम पदरी पडेल ..

एखादे काम मिळाल्यास खूप वेळ लावा
डब्यात काही भरून द्यायचे असेल तर सांड लवण केल्या शिवाय भरू नका ...

उगाचच या रूम मधून त्या रुम मध्ये जा
जे  काम सांगितले जाईल तेच करा स्वतः चे डोके वापरू नका ...

चव बघायला मिळेल तेव्हा चेहऱ्यावरचे भाव बदलत चव बघा .. निर्विकार चेहऱ्याने चव बघू नका ...सगळीच चव घालवाल ..
चव बघतांना थोडं मीठ कमी वाटतंय ..
जरा तिखट पाहिजे असा अभिप्राय द्या सगळंच छान झालंय असं एकदम म्हणू नका...

मी काही मदत करू का हे वाक्य दिवसा कमीत कमी ताशी चार वेळा तरी म्हणा ...☺️

किती दमतेस तू हे वाक्य वेळ पाहून म्हणा आणि ब्राउनी पॉईंट्स मिळवा
लाइटिंग च्या माळेचा गुंता खूप वेळ सोडवत बसा ...

बाहेरचे काम सांगितले कि जरा जास्त वेळ घ्या आणि घरी आल्यावर किती ऊन होते ट्रॅफिक खूप होती हे सांगतांना दमलो आहे असा अभिनय करता करता पाणी प्या ...

बायको कोठे बाहेर गेली असेल/ घरात नसेल तर  अजिबात कोणत्याही कामाला हात लावू नका...
तिच्या अनुपस्थितीत तुम्ही कितीही कामं केली
 तरी ती कामं काम म्हणून पकडली जात नाही...जे तिच्या डोळ्यांना  दिसतं तेच काम...😟

सिलेंडर बदलणे ,
माळ्यावरून मोठे पातेले काढणे ,
घट्ट झाकण उघडणे , किराणा लावणे
फर्निचर सरकवणे ,
हि अत्यंत अवघड कामे आहेत असा अभिनय करा ...
मित्रां बरोबर पार्ट्यांची हि वेळ नाही...
जरा धीर धरा ...
सोन्या चांदीच्या दुकाना जवळून गाडी जोरात घ्या प्रत्येक गोष्टीला हो , चालेल ,
 बरं ठीक आहे ..
घेऊया आपण...
 हे म्हणत रहा..

या वेळी बायकोचा मूड हा सेन्सेक्स सारखा असतो खूप उतार चढाव होऊ शकतात .
 तो अपट्रेन्ड मध्ये असेल तर फायदा करून घ्या आणि डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर अजिबात रिस्क घेऊ नका .

तिने केलेल्या फराळाची तुलना कोणाशीही करू नका संध्याकाळी बाहेर जेवायला जा किंवा ऑर्डर करा

आणि सगळ्यात महत्वाचे  या अशा  कामाच्या दगदगीत असले रिकामटेकडे लेख लिहीत बसू नका ...

हे सर्व वाचता वाचता लाडू वळून झाले असते...🫢🫣

Wednesday, January 18, 2023

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहूया.
तिळगूळ घ्या आणि पाठीमागून गोड बोला, तोंडावर गोड सगळेच बोलतात.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
🌹🌹

तीन धडे

🌺🚩तुमची आकलन शक्ती व इच्छाशक्ती तुम्हाला फसवणूक होण्यापासून वाचवू शकते🌺🚩🙏
         
वाचायला सुरुवात करण्याआधी... आपले डोळे अलगद बंद करा... जीवनातील असा एक प्रसंग आठवा की तुम्ही कुणासाठी काहीतरी चांगले केले होते... त्यावेळी तुम्हाला कसे वाटले होते आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली होती त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय होती...

तीन धडे

💐एक यशस्वी उद्योजक ""नारायण मुर्ती"" यांनी सांगितले की 💐:

जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.

माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली.

एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, "बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो."

 त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे.

म्हणूनच मी ज्या  वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली.

जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले,  "बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल."

 दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले,2 "बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे."

ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली! मी अंड नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.

 पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, "बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही."

तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका  वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, "बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?"

 या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, "आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे."

माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर  एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो!

माझ्या वडिलांनी  प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, *"माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस  की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!"

मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.. "आदरणीय श्री नारायण मुर्ती साहेब , आदर्श उद्योजक'

🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा...!!!

🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका...!!!

 🌺खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!

🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट, कठीण व अडचणीच्या प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगू शकत नाही हे ही लक्षात ठेवा"...!!!🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

Saturday, November 13, 2021

वर्क फ्रॉम ऑफिस

 वर्क फ्रॉम ऑफिस 🏢


प्रवेश १:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल.


ही💁‍♀️: अरे बापरे! म्हणजे आपल्याला भांडी, केर, लादी करायला बाई शोधायला लागेल...


मी💁‍♂️:.....😟


प्रवेश २:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल


ही💁‍♀️: चला, म्हणजे आता घरात थोडी तरी शांतता असेल!


मी💁‍♂️:.......🤔


प्रवेश ३:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल


लेक👱‍♀️: य्ये!!! म्हणजे आख्खा नेट पॅक मला वापरता येईल


मी💁‍♂️:.......😊


प्रवेश ४:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल


आई👵: म्हणजे आता केव्हाही कुकर, मिक्सर लावून चालेल.


मी💁‍♂️:......😏


प्रवेश ५:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल


ही💁‍♀️: डबा नेणार नसशिलच. बाहेरचं चरायला आवडतं ना!!


मी💁‍♂️:......😵‍💫


प्रवेश ६:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल


ही💁‍♀️: चला, म्हणजे निदान आता तरी रोजच्या रोज दाढी करशील!


मी💁‍♂️:......👨🏻


प्रवेश ७:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल


ही💁‍♀️: बसवेल का एवढा वेळ ऑफिसात? घरी दर अर्ध्या तासाने लोळतोस!!!


मी💁‍♂️:.....😡


प्रवेश ८:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल


ही💁‍♀️: यापुढे उशीर होणार असेल तर "खूप काम होतं" अशी थाप आता मारू नकोस. किती काम असतं ते पाहिलंय आम्ही.


मी💁‍♂️:......😫

Sunday, March 8, 2020

Happy womens day 2020

"ती" आहे म्हणून सारे 'विश्व' आहे,
"ती" आहे म्हणून 'घर' आहे,
"ती"आहे म्हणून 'सुंदर नाती' आहेत,
आणि केवळ "ती" आहे,
म्हणून "नात्यांमध्ये प्रेम" आहे...

💐जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.💐

Sunday, December 29, 2019

Pune Jokes - अचाटबुध्दी संपन्न पुणेकर


😜 अचाटबुध्दी संपन्न पुणेकर ! 😜
*****
पुण्यात विकल्या जात असलेल्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्यं असावेच लागते.

😜 खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण . .
‘आमचे येथे रसाळ खजूर मिळतील’
हे फक्त पुण्यात !

😜 एरवी जर्दाळू सगळीकडे ..
पण “पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात !

😜 केशरात ‘असली’ केशर फक्त पुण्यात.

😜 सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या
भारतात असली ..तरी ‘वेलचीयुक्त चहा’ ही पाटी फक्त पुण्यात दिसते.

😜 परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली -
‘गणपती कारखाना’ पण तेच पुण्यात बघितले तर
“आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मुर्ती मिळतील”!

😜 एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना
“चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतिच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट” अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेनं दुकानात शिरलो. उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहीलाय की काय?

चौकशी अंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबानं मजकूरात बदल नाही.

😜 शनिपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा मजकूर वाचून मी कोलमडायच्याच बेतात होतो..
ती पाटी म्हणजे “येथे टिकाऊ आणि दर्जेदार जानवीजोड मिळतील” !!!!

😜 आणि अजुन एक ..
"आमच्याकडे दणकट पायजमा आणी मुलायम बंडी मिळतील" अशी ही पाटी होती.

पुण्यात याची देही याची डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या

😜 येथे खास मालवणी पद्धतीने बनवलेले ओरिजनल चायनीज मिळेल.

पुढील अजुन कहर...

😜 येथे सेकंडहॅंड कवळ्या स्वस्तात मिळतील !!!!

😜 येथे गेलेल्या फटाक्यांना वाती लाउन मिळतील !

Climax ...

😜 एका दुकानात "येथे वैकुंठालंकार मिळतील"
असे लिहिले होते. मी उत्सुकतेने पाहिले की काय असेल तिथे तर काय सांगू!

अंत्यविधीला लागणा-या सामानाचे ते दुकान होते

अचाट बुध्दीचे धनी असणाऱ्या सर्व पुणेकरांना समर्पित!

School Exams - Athwani - शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!

"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!

"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!

पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..

"संदर्भासहीत स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

"कवितेच्या ओळी पुर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!

"निबंध लिहा", किंवा "गोष्टं लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!

तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनीj आठवली...
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!

Wednesday, January 25, 2017

Wangi premachi kahani



कुणास ठाऊक का पण मला "वांगी" लै भारी फळभाजी वाटते...

वांग्यावरील प्रेमापोटीच मला वांग-मय फार आवडत...

एकतर वांगी सर्वत्र सहज उपलब्ध असतात, त्यांना atittitude वगैरे काहीही नसतो आणि भाजीच्या टोपलीत वांग पद्मनाभाच्या मूर्तीप्रमाणे मुकुट घालून कायम निवांत निजलेलं असत...

वांग तस पूर्णतः नॉन-ग्लॅमरस पात्र...

पूर्वी टीव्हीवर भाज्यांचं एक कार्टून यायचं, त्यात वांग हे अट्टल दारुड दाखवायचं, बघताना लै मजा यायची...

मांसाहारी पार्टीत शाकाहारी मित्रांचा एकमेव आधार म्हणजे भरिताची पोट सुटलेली स्थूल वांगी...

वांगी बघून कुणालाही फार आनंद होत नसला तरी दुःखही होत नाही. शिवाय वांग्याची भाजी अतिशय सहज रेसिपी. कांदा-लसूण पेस्ट, टमाटर, मिर्ची, हळद, तिखट मीठ घालून त्यात वांग्याच्या फोडी घालून थोडं पाणी घातलं आणि वरून मटण मसाला घातला की जगातील साऱ्या भाज्या त्यापुढे झक मारतात...

वांग्याच्या लंबुळका आकार पाहून मला "बिना पायल के ही बजे घुंगरू" गाण्यातील संजय कपूरची "क्या तुने किया जादूsss" म्हणतानाची हनुवटी आठवते. त्यावेळी त्याचा चेहरा हा लंबुळक्या वांग्याप्रमाणेच दिसतो. त्यात त्याची को-स्टार माधुरी दीक्षित, म्हणजे फुल्ल पनीर बैगन मसाला...

Marathi Mathematics Joke

आता तर हद्दच पार झाली गणिताची...

गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम.

१) महादेवाच्या पिंडीसमोर
     उभा आहे नंदी
    आयताचे क्षेञफळ =
     लांबी x रूंदी.

२) हिमालयातील काश्मिर
     म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
     चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
      बाजूंचा वर्ग.

३) देवीची ओटी भरू    
     खणानारळाची,
    ञिकोणाचे क्षेञफळ =
      १/२xपायाxउंची.

४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे
     १९४२ ची चळवळ,
     (सहा बाजू) वर्ग.....
      हे घनाचे पृष्ठफळ

Tuesday, January 17, 2017

Father daughter caring - baba - lek article

बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!
*****
न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी
"आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते ....
**
शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून
"सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते.....
*
दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज
"बाबा एक घास हवा का?"
विचारते तेंव्हा ती मोठी होते.....
*
जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज "बाबा ङोक दुखतय का? बाम लावू का ?" विचारते तेंव्हा ती मोठी होते......
*
चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज
"बाबा तुम्हाला पाहीजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या" म्हणते तेंव्हा ती मोठी होते.......
*
मिकी माऊस आणी छोटा भिम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का ?" असं विचारते तेंव्हा ती मोठी होते.......
*
बाहेरगावी कामाला जाताना
बाबा जाऊ नको ना ssss म्हणत बॅग आत नेवून लपवणारी मुलगी आज
"बाबा तुमची बॅग भरू का विचारते" तेंव्हा ती मोठी होते......
*

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

        एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"
       या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
      " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.
       सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.
        जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.
       या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.
       भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
       एका विहरीभोवती चार विहीरी होत्या.
       चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
       पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
       हे पाहून भीम चक्रावून गेला.
      नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे.
       जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली.
       पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
      खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले.
      तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते.
      हे पाहून नकूल गोंधळून गेला.
      सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
      ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.
      यावेळी सहदेवही चकीत झाला.
      या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
      श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
     "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.
      कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
      श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
      कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.
       कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."

       🙏राम कृष्ण हरी🙏

     "जसे कर्म, तसे फळ."

"कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."

Maitri or Friendship what goes wrong?

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??

1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..
2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..
3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..
4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..
5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..
6) आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल.. असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा..
7) मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ.. आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा..
8) भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे.. असे आपण ठरवतो तेव्हा..
9) मित्र श्रीमंत झाल्यावर.. आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा..
10) आपला मित्र आता बदलत चालला आहे.. अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा..
11) मित्र बिझी असेल.. त्यालाही त्याच्या अडचणी असतील.. हे आपण विसरायला लागतो तेव्हा..
12) आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा..
13) आपण जसा विचार करतो.. तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे.. असा दुराग्रह बनतो तेव्हा..
14) आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे.. हे लोकांना सांगायला हवे.. अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा..
15) खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा..
16) कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा..
17) आपले मित्रांशिवाय काही अडत नाही.. हे आपण नकळतमित्राला दर्शवायला लागतो तेव्हा..
18) आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा..
19) मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही.. याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय.. असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा..

Tuesday, December 13, 2016

Saint Gnyaneshwar - Suvichar

ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार : -

१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
                ---------  संत ज्ञानेश्वर🌹


२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
                --------- संत ज्ञानेश्वर🌹

३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
                  --------संत ज्ञानेश्वर🌹

४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
                  --------- संत ज्ञानेश्वर🌹

५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
                 --------- संत ज्ञानेश्वर 🌹

६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
                   ---------  संत ज्ञानेश्वर 🌹

७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
                  ---------  संत ज्ञानेश्वर 🌹

८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
                    --------- संत ज्ञानेश्वर 🌹

९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे,
                ---------  संत ज्ञानेश्वर🌹

१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधीb मी गमावता कामा नये.
                  ---------  संत ज्ञानेश्वर

Monday, December 12, 2016

Marathi Suvichar - Swabhawala Aushadh

⁠[9:42 PM, 12/9/2016] Aai Borivali: ⁠⁠⁠🌹🐾🐾🇮🐾🐾🌹 🙏स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायच असतं..॥👏 अधिरातला 'अ' सोडून, थोडं धिरानं घ्यायच असतं ॥👏 संतापातला 'ताप' सोडून, मनाला संत करायच असतं ॥👏 मनातला हट्ट सोडून, नात घट्ट करायच असतं॥👏 माझ्यातला मी सोडून, तिच्यातला 'ती'ला जपायच असतं ॥👏 आपलं बोलणं सोडून कधी, समोरच्याचही ऐकायच असतं ॥👏 एकाच दिवशी नाही तरी, हळू हळू बदलायचं असतं ॥👏 थोडं थोडं का होईना, रोज प्रेम मात्र द्यायच असतं ॥👏 एकाचा राग दुसऱ्यावर न काढता, समोरच्याला समजून घ्यायचं असतं ||👏 स्वभावाला औषध असतं, फक्त ते रोज घ्यायच असतं !!👏 🙏 शुभ सकाळ 🙏 🍀🍀🌹🌻🌹🍀🍀
⁠⁠⁠⁠9:42

Bewada - Marathi Joke

एका बेवड्याने
मित्रांसाठी पार्टि करायचे
ठरवले...🍖🍗
आणि पार्टि साठी आपल्याच
घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐
त्यांनी बकरा चोरला पण
आणि मित्रांसोबत मनसोक्त
पार्टि केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय
काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :-
हा बकरा इथे कसा..???
बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???🐕


हसू नका  !!!!!!!
पुडे पाठवा नवीन आहे
😂😂😂😂😂😜
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥