बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!
*****
न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी
"आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते ....
**
शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून
"सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते.....
*
दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज
"बाबा एक घास हवा का?"
विचारते तेंव्हा ती मोठी होते.....
*
जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज "बाबा ङोक दुखतय का? बाम लावू का ?" विचारते तेंव्हा ती मोठी होते......
*
चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज
"बाबा तुम्हाला पाहीजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या" म्हणते तेंव्हा ती मोठी होते.......
*
मिकी माऊस आणी छोटा भिम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का ?" असं विचारते तेंव्हा ती मोठी होते.......
*
बाहेरगावी कामाला जाताना
बाबा जाऊ नको ना ssss म्हणत बॅग आत नेवून लपवणारी मुलगी आज
"बाबा तुमची बॅग भरू का विचारते" तेंव्हा ती मोठी होते......
*
पटकन मोठी झालेली ती,
लग्न करून जाताना
"बाबा रङू नको" म्हणत स्वतः धाय मोकलुन रङते
तेंव्हा मात्र ती परत लहान होते...
तेंव्हा मात्र ती परत लहान होते...
**
शेवटच्या चार ओळीत सारे सामावले आहे. वेगळे अजून काय सांगू ?
पण एक लक्षात ठेवा ग मुलींनो, तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता. मुलावर प्रेम असेलही बाबांचे पण मुलीवर "जीव" असतो. म्हणूनच तुम्हीही त्याला जीवापाड जपा. त्याला तुमच्याकडून फार काही नको असतं. फक्त निखळ प्रेम हवं असतं. आणि त्या प्रेमापुढे जगातलं कोणतंही "सैराट" प्रेम हे फिकेच आहे. बाप होता म्हणून तर तुम्ही हे जग पाहू शकलात, या एका गोष्टीसाठी का होईना त्या बाबाला तो कधी चुकलाच तर मन मोठे करून माफ करा.