Showing posts with label family. Show all posts
Showing posts with label family. Show all posts

Tuesday, January 17, 2017

Father daughter caring - baba - lek article

बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!
*****
न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी
"आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते ....
**
शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून
"सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते.....
*
दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज
"बाबा एक घास हवा का?"
विचारते तेंव्हा ती मोठी होते.....
*
जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज "बाबा ङोक दुखतय का? बाम लावू का ?" विचारते तेंव्हा ती मोठी होते......
*
चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज
"बाबा तुम्हाला पाहीजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या" म्हणते तेंव्हा ती मोठी होते.......
*
मिकी माऊस आणी छोटा भिम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का ?" असं विचारते तेंव्हा ती मोठी होते.......
*
बाहेरगावी कामाला जाताना
बाबा जाऊ नको ना ssss म्हणत बॅग आत नेवून लपवणारी मुलगी आज
"बाबा तुमची बॅग भरू का विचारते" तेंव्हा ती मोठी होते......
*

Monday, August 27, 2012

What is love? प्रेम म्हणझे नेमके काय


मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की,
कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम....
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजेप्रेम....
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम....
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम...
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम....
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम....

Wednesday, August 8, 2012

Sutti ka ghet naahi lok / लोक सुट्ट्या का घेत नाहीत

लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतोकाही जणांची कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेषकल्पना असतेएकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतोसंवाद ऐका बरं " अरे यार चार चार ऑफिसर आहेत बँकेत पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो." "काबाकीचे काही काम करत नाहीत?" मी विचारले... "काही काम करत नाहीत रे ...आणि आमचा म्यानेजर पण काही बोलत नाही ." एकूणच माझ्या या मित्राला बँकेत केवळ हमी एकटाच कामाने मारतो आहे असे वाटत होते . " मी एक उपाय सुचवू का ?" मी विचारले . तीन आठवडे सुट्टी घे" मी म्हणालो. "सुट्टी घेऊन काय करूउगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस. " तो डाफरला . 
"तीन आठवडे सुट्टी घेघरी पडे रहो करलायब्ररी मधून फिल्म च्या सी डीज आण , पुस्तके वाचपण या तीन आठवड्यात एक काम करायचे ...ते म्हणजे एकदाही बँकेच्या जवळपास ही जायचे नाही. " "त्याने काय होईल?" "तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास तरी बँक चालू राहिलीबंद पडली नाही . तुझ्या एकट्या मुळे बँक चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ " माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाहीआपल्यामुळे ऑफिस चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात
माझे एक परिचित आहेतकधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावेदर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहकार्याला फोने करून "काय रे काय चालले आहे ?" असे म्हणून पिडत असतातआपल्या पाठीमागे ऑफिस मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड . म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाहीअसुरक्षितातेची भावना हे पण काही जणाच्या सुट्टी न घेण्या मागचे कारण असू शकते . 
पाश्चात्य देशातील काही चांगली व्यवस्थापन तत्त्वे आपण उचलली पाहिजेत . तिथे सुट्ट्या कमी असल्या तरी त्या घेतल्याच पाहिजेत असा दंडक असतो . रजा विकणे ,साठवून ठेवणे , पेन्शनीत वर्ग करणे असले प्रकार नसतात . माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्या साठी रजा ही घेतलीच पाहिजे असा स्पष्ट आग्रह तिथे असतो .आपले म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी त्यांच्या सोयीच्या आणि पगार जास्तीत जास्ती वसूल कसा करता येईल अशाच गोष्टी उचलल्या आहेत बाकीच्या नुसत्या गप्पानारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असतेत्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जाकुटुंबासाठी वेळ काढा , इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे.आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात होम्हणून त्यांचे कौतुक करतोआणि निदान रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो
सांगायचा मुद्दा काय की आपण काही तरी लंगड्या सबबी सांगून रजा घेण्याचे टाळतो . कुटुंब आणि स्वतःला जो वेळ द्यायचा तो देत नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला आहे ते कळत नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागवत राहतोरागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असतेचिडलेलाथकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....आयुष्याचे संगीत शोधा...जगण्याची प्रेरणा शोधा...ऐका...एक सुट्टी घ्या... Ugichch
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥