Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Wednesday, January 25, 2017
Wangi premachi kahani
कुणास ठाऊक का पण मला "वांगी" लै भारी फळभाजी वाटते...
वांग्यावरील प्रेमापोटीच मला वांग-मय फार आवडत...
एकतर वांगी सर्वत्र सहज उपलब्ध असतात, त्यांना atittitude वगैरे काहीही नसतो आणि भाजीच्या टोपलीत वांग पद्मनाभाच्या मूर्तीप्रमाणे मुकुट घालून कायम निवांत निजलेलं असत...
वांग तस पूर्णतः नॉन-ग्लॅमरस पात्र...
पूर्वी टीव्हीवर भाज्यांचं एक कार्टून यायचं, त्यात वांग हे अट्टल दारुड दाखवायचं, बघताना लै मजा यायची...
मांसाहारी पार्टीत शाकाहारी मित्रांचा एकमेव आधार म्हणजे भरिताची पोट सुटलेली स्थूल वांगी...
वांगी बघून कुणालाही फार आनंद होत नसला तरी दुःखही होत नाही. शिवाय वांग्याची भाजी अतिशय सहज रेसिपी. कांदा-लसूण पेस्ट, टमाटर, मिर्ची, हळद, तिखट मीठ घालून त्यात वांग्याच्या फोडी घालून थोडं पाणी घातलं आणि वरून मटण मसाला घातला की जगातील साऱ्या भाज्या त्यापुढे झक मारतात...
वांग्याच्या लंबुळका आकार पाहून मला "बिना पायल के ही बजे घुंगरू" गाण्यातील संजय कपूरची "क्या तुने किया जादूsss" म्हणतानाची हनुवटी आठवते. त्यावेळी त्याचा चेहरा हा लंबुळक्या वांग्याप्रमाणेच दिसतो. त्यात त्याची को-स्टार माधुरी दीक्षित, म्हणजे फुल्ल पनीर बैगन मसाला...
आम्ही विदर्भातील लोक्स म्हणजे वांग्याचे प्रचंड दर्दी, म्हणून आम्ही बेगमपल्ली आंब्याला सुद्धा बैगन-फल्ली म्हणतो...
पंजाबीत कुणी जेव्हा मैं ओत्थे जा-वांगा, आ-वांगा म्हणत, रोटी पुरी नाल चपांदे वांगे म्हणत, तेव्हा वांग्यांचा प्रादेशिक वांग-मयीन ऑरा सुद्धा लक्षात येतो...
वांग्याची विशेषता म्हणजे ती बंगल्यातील मॉड्युलर किचनवरील प्रेस्टीजच्या बर्नरवरही शिजतात आणि गरीबाच्या झोपडीतील विटांच्या चुलीवरही शिजतात...
वांग्याच्या माझ्या आयुष्यावर इतका प्रभाव आहे की मी गाणं सुद्धा, "किसी शायर की गझल...ब्रिन्जल" असच गुणगुणतो...
कहो ना प्यार है चित्रपटातील एका गाण्यात लकी अली "ए आंबे हो" असं गायला, तो "ए वांगे हो" असं का नाही गायला याबद्दल माझा तीव्र आक्षेप आहे...
शाळा कालेजात मला वांगे आडनाव असलेले मास्तर नाही लाभले याचे मला मरेपर्यंत शल्य राहील...
त्या २ एकरातील वांग्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
इती वाङ्मय पुराण समाप्त.
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥