Showing posts with label aala. Show all posts
Showing posts with label aala. Show all posts

Sunday, December 29, 2019

Pune Jokes - अचाटबुध्दी संपन्न पुणेकर


😜 अचाटबुध्दी संपन्न पुणेकर ! 😜
*****
पुण्यात विकल्या जात असलेल्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्यं असावेच लागते.

😜 खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण . .
‘आमचे येथे रसाळ खजूर मिळतील’
हे फक्त पुण्यात !

😜 एरवी जर्दाळू सगळीकडे ..
पण “पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात !

😜 केशरात ‘असली’ केशर फक्त पुण्यात.

😜 सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या
भारतात असली ..तरी ‘वेलचीयुक्त चहा’ ही पाटी फक्त पुण्यात दिसते.

😜 परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली -
‘गणपती कारखाना’ पण तेच पुण्यात बघितले तर
“आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मुर्ती मिळतील”!

😜 एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना
“चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतिच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट” अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेनं दुकानात शिरलो. उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहीलाय की काय?

चौकशी अंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबानं मजकूरात बदल नाही.

😜 शनिपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा मजकूर वाचून मी कोलमडायच्याच बेतात होतो..
ती पाटी म्हणजे “येथे टिकाऊ आणि दर्जेदार जानवीजोड मिळतील” !!!!

😜 आणि अजुन एक ..
"आमच्याकडे दणकट पायजमा आणी मुलायम बंडी मिळतील" अशी ही पाटी होती.

पुण्यात याची देही याची डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या

😜 येथे खास मालवणी पद्धतीने बनवलेले ओरिजनल चायनीज मिळेल.

पुढील अजुन कहर...

😜 येथे सेकंडहॅंड कवळ्या स्वस्तात मिळतील !!!!

😜 येथे गेलेल्या फटाक्यांना वाती लाउन मिळतील !

Climax ...

😜 एका दुकानात "येथे वैकुंठालंकार मिळतील"
असे लिहिले होते. मी उत्सुकतेने पाहिले की काय असेल तिथे तर काय सांगू!

अंत्यविधीला लागणा-या सामानाचे ते दुकान होते

अचाट बुध्दीचे धनी असणाऱ्या सर्व पुणेकरांना समर्पित!

Thursday, June 4, 2009

Lyrics Aala/Ala Khushit Samindar (आला खुशीत्‌ समिंदर)

गीत : अनंत काणेकर
संगीत : केशवराव भोळे
गायिका : ज्योत्सना भोळे


आला खुशीत्‌ समिंदर, त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू ! || ध्रु ||

हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,
सफेत फेसाची वर खळबळ,
माशावाणी काळजाची तळमळ
माझि होडी समिंदर, ओढी खालीवर,
पाण्यावर देइ ना ग ठरू,
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू ! || १ ||

तांबडं फुटे आभाळांतरी,
रक्तावाणी चमक्‌ पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काही तरी !
झाला खुळा समिंदर, नाजुक्‌ होडीवर,
लाटांचा धिंगा सुरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू ! || २ ||

सूर्यनारायण हसतो वरी,
सोनं पिकलं दाहिदिशांतरी,
आणि माझ्याहि नवख्या उरी !
आला हासत समिंदर, डुलत फेसावर,
होडीशी गोष्ट करू,
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू ! || ३ ||

गोऱ्या भाळी तुझ्या लाल्‌ चिरी
हिरव्या साडीला लालभडक धारी,
उरी कसली ग गोड शिरशिरी ?
खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर,
चाले होडी भुरुभुरू,
सजणे, वाऱ्यावर जणु पाखरू ! || ४ ||
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥