गीत : अनंत काणेकर
संगीत : केशवराव भोळे
गायिका : ज्योत्सना भोळे
आला खुशीत् समिंदर, त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय् धरू ! || ध्रु ||
हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,
सफेत फेसाची वर खळबळ,
माशावाणी काळजाची तळमळ
माझि होडी समिंदर, ओढी खालीवर,
पाण्यावर देइ ना ग ठरू,
सजणे, होडीला बघतोय् धरू ! || १ ||
तांबडं फुटे आभाळांतरी,
रक्तावाणी चमक् पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काही तरी !
झाला खुळा समिंदर, नाजुक् होडीवर,
लाटांचा धिंगा सुरू
सजणे, होडीला बघतोय् धरू ! || २ ||
सूर्यनारायण हसतो वरी,
सोनं पिकलं दाहिदिशांतरी,
आणि माझ्याहि नवख्या उरी !
आला हासत समिंदर, डुलत फेसावर,
होडीशी गोष्ट करू,
सजणे, होडीला बघतोय् धरू ! || ३ ||
गोऱ्या भाळी तुझ्या लाल् चिरी
हिरव्या साडीला लालभडक धारी,
उरी कसली ग गोड शिरशिरी ?
खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर,
चाले होडी भुरुभुरू,
सजणे, वाऱ्यावर जणु पाखरू ! || ४ ||
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Showing posts with label ज्योत्सना. Show all posts
Showing posts with label ज्योत्सना. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥