Showing posts with label kavita. Show all posts
Showing posts with label kavita. Show all posts

Sunday, December 29, 2019

School Exams - Athwani - शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!

"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!

"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!

पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..

"संदर्भासहीत स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

"कवितेच्या ओळी पुर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!

"निबंध लिहा", किंवा "गोष्टं लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!

तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनीj आठवली...
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!

Tuesday, July 14, 2015

Kavita: कसं जमतं गं तुला?

एकांत क्षणी प्रेयसी होणं...

निवांत क्षणी सखी होणं...

अपयशाच्या क्षणी आई होणं...

अन यशाच्या क्षणी सहचारिणी होणं...



किती बदलतेस भूमिका

किती वेळा, कशा?


कसं जमतं गं तुला?

भूक लागली असता भाकरी होणं,

स्पर्श हवा असता रेशीम होणं,

गंध हवा असता मोगरा होणं,

अन तहान लागली असता पाऊस होणं…


कसं कळतं गं तुला?

मला काय हवंय? केंव्हा? आणि कसं?


आणि जमतं तरी कसं

असं भाकरी, रेशीम, मोगरा होणं

किंवा पाऊस होऊन कोसळणं

मला जेंव्हा हवं तेंव्हा,

मला जसं हवं तसं…


मी मात्र गृहित धरतो

मला हव्या त्या वेळी, हव्या त्या रूपात

तू असशीलच हे

तुला ‘बायको’ नावाचं लेबल लावतो

आणि 'बायकोनी असंच असलं पाहिजे'

हे मानतच जातो मनोमन


माझं हे मानणं, माझी ही गृहितं, माझ्या ह्या अपेक्षा...

ह्याही तू स्वीकारतेस मनोमन...

अन वागतेस हे सारं सारं पूर्ण करण्यासाठी

कितीही अोझं वाटलं, कितीही त्रास झाला

तरी तो मला जाणवू न देता
हे सारं सारं जगणं

Dedicated 👆to all wonderful women 👍👍

कसं जमतं गं तुला?

Friday, July 10, 2015

Marathi kavita: Bayko

बायको.....!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!
तिचे अस्तित्व हवे असते
सकारात्मक खलबतांसाठी..!
बायको म्हणजे बंदर असते
नवरा नावाच्या गलबतासाठी..!!
संसारातील जिवनसाथीसाठी
शोधाशोध नात्यांच्या डेऱ्यांसवे..!
बायको नावाचा शाश्वत आधार
मिळतो सप्तपदीच्या फेऱ्यांसवे..!!
सर्वांच्या आनंदासाठी
ती साथ देणारी सावली असते..!
दुखऱ्या क्षणी सावरायला
बायको नावाची माउली असते..!!
गंध सुखाचा अनुभवणारा
घरात सर्वांचा ताफा असतो..!
कुटुंबात दरवळणारा
बायको नावाचा चाफा असतो..!!
कर्तव्याच्या करारावरची
ती न पुसणारी शाई असते..!
प्रत्येकाची आवड जपणारी
बायको नावाची घाई असते..!!
आजारपणात फणफणणाऱ्या
ती लेकरांसाठी धट्टी असते..!
कपाळावरील मिठाची
बायको नावाची पट्टी असते..!!
स्वयंपाक, धुणे,दळणकांडप
तिचे राब-राबणारे हात असतात..!
प्रसंगी शिळेपाके चावणारे
बायको नावाचे दात असतात..!!
सर्व दुःखांना स्वतःमध्ये
ती मळणारी उंडी असते..!
जन्म दिलेल्या फुलझाडांसाठी
बायको नावाची कुंडी असते..!!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!

Thursday, July 9, 2015

About Husbands

जरा बऱ नसेल तर नवरे
कित्ती मदत करतात,

तु झोप आता म्हणून
दहा वेळा उठवतात.

चहा कशात आहे,
साखर संपलीये का,
 गाळणं कुठाय?

सगळे डब्बे ओट्यावरच
मुक्कामाला येतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

टेबलावरची वर्तुळ सांगतात
किती झालाय चहा,

आवरणारे म्हणतात
तू झोपुनच रहा,

फडके म्हणुन नवाकोरा
नॅपकीन ही घेतात.

जरा बऱ नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

दुध जातंच ऊतु
जरी केलं 'वर्क फ्रॉम होम'
आणि ऑफिसला गेले तर
फोन वर फोन.

चौकशीच्या नादात
बायकोची झोप विसरतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

खरकटी भांडी आणि
पिम्पाखाली तळे,

कुकरच्या अगणित शिट्या
आणि पोळी भाजीची पार्सले.

यांच्या दर्शनानेच बहुदा
आजारपणे पळतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

रागावू नका, एखादा नवरा
असेलही जगावेगळा.

सन्माननीय अपवादांनी
स्वतःला वगळा.

पण असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात

कि पलीकडचे रंग
जरा जास्तच हिरवे दिसतात.
 म्हणे नवरे मदत करतात??

Wednesday, July 8, 2015

Shala aani college


शाळा : म्हणजे गणवेश, नीटनेटकेपणा.....

काॅलेज : म्हणजे कसाही अवतार
आणि स्टाईल.....



शाळा : पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन,
पट्टी.....

काॅलेज : एक बॉलपेन तो पण
मित्राकडून घेतलेला......



शाळा : वर्गात येण्याआधी "टीचर, मे आय कम इन..?" किंवा "टीचर, मी आत येवू का...?"

काॅलेज : वर्गाजवळ येणार, किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.



शाळा : सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार...!

काॅलेज : मित्राला बोलणार "अरे यार एक पेज तर दे ना".



शाळा : पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार, काय स्कॉलर आहे हा यार.

काॅलेज : फ्रेंड्स बोलणार "काही येत
नाही त्याला म्हणून निघालाय".

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते.

काॅलेज : उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : म्हणजे व्यवस्थित पाठांतर.

काॅलेज : म्हणजे नुसता रट्टा.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : म्हणजे मजा, मस्ती, धमाल.

काॅलेज : म्हणजे जस्ट चिल यार.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : यार, मला ती आवडते.

काॅलेज : सांभाळून बघ रे वहिनी आहे........
miss you my all sweet friends

Sunday, September 9, 2012

Ek Kavita

धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,
सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,
हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,
आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,
त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितिहि जङ असु दे....जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,
दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,
कितिहि उकङत असु दे...वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,
पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,
कितिहि तुटका असु दे...ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,
दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,
"बालपन देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,
आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,
तो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला...मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥