Thursday, July 9, 2015

About Husbands

जरा बऱ नसेल तर नवरे
कित्ती मदत करतात,

तु झोप आता म्हणून
दहा वेळा उठवतात.

चहा कशात आहे,
साखर संपलीये का,
 गाळणं कुठाय?

सगळे डब्बे ओट्यावरच
मुक्कामाला येतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

टेबलावरची वर्तुळ सांगतात
किती झालाय चहा,

आवरणारे म्हणतात
तू झोपुनच रहा,

फडके म्हणुन नवाकोरा
नॅपकीन ही घेतात.

जरा बऱ नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

दुध जातंच ऊतु
जरी केलं 'वर्क फ्रॉम होम'
आणि ऑफिसला गेले तर
फोन वर फोन.

चौकशीच्या नादात
बायकोची झोप विसरतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

खरकटी भांडी आणि
पिम्पाखाली तळे,

कुकरच्या अगणित शिट्या
आणि पोळी भाजीची पार्सले.

यांच्या दर्शनानेच बहुदा
आजारपणे पळतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

रागावू नका, एखादा नवरा
असेलही जगावेगळा.

सन्माननीय अपवादांनी
स्वतःला वगळा.

पण असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात

कि पलीकडचे रंग
जरा जास्तच हिरवे दिसतात.
 म्हणे नवरे मदत करतात??
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥