Wednesday, August 8, 2012

Kaahi Wichar - Marathi Thoughts for life


   बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तूकाय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली.त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.
              
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामेव्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती! 


             
कुठलंही काम, प्रॉजेक्‍ट, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्‍लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातातघ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊनका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषीस्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा. 
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.



दोन तत्त्वं : 

"
एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"
दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात "

Tuesday, August 7, 2012

Tujhya wina/vina lyrics - तुझ्या विना - Mumbai Pune Mumbai

तुझ्या विना  (Shabda)

तुझ्या विना.... तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना....

भास का हा तुझा होतसे मला सांगना
लागते ओढ का सारखी अशी सांगना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....

भास का हा तुझा होतसे मला सांगना
लागते ओढ का सारखी अशी सांगना
झाले अनोळखी माझी मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....


उमझून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांगणा जीव हा गुंतला
झाले आता जरी
होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....

(वैशाली सामंत:)
वाट होते माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली..
फिरुनी पुन्हा नवे
नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....

तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....

Marathi song lyrics: Ka kale na (mumbai pune mumbai)

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे

एक मी एक तू शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू , सत्यात तू , साऱ्यात तू

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे

घडले कसे कधी कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठावरी
दे न तू साथ दे
हातात हात दे
नजरेतना नजरेतुनी इकरार दे

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे

Thursday, May 31, 2012

Marathi jokes (katta)


शिक्षक : एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २ भिंती बांधायला किती खर्च येईल? 
विद्यार्थी : १०० करोड. 
शिक्षक : नालायक, तुझ्या बापाच नाव काय? 
विद्यार्थी : सुरेश कलमाडी.
----------
 
Psychology 
चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली .उंदीर लगेच केककडे धावला . सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली , पुन्हा तोच प्रकार. सरांनी पदार्थ बदलून पहिले , उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला. 
सर : यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही. 
एवढ्यात पक्क्या ओरडला , "सर , एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना ." 
------------
 
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले , "अगं , आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं ?"पत्नी : कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता ? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन? गोपाळराव : तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात ...अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत .
----------
 
लाईट आल्यावर खोलीतील देशस्थ आणि कोकणस्थ कसा ओळखावा ? 
लाईट आल्यावर "आले " म्हणून आनंदाने चित्कारतो तो देशस्थ , ... आणि जो लगेच मेणबत्तीवर फुंकर मारतो तो कोकणस्थ. 
----------
 
शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवला, पण गाढव पाणीच प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात? चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो . 
----------
 

वडील : अरे, एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो .मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय! 
----------
 
रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता , लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला, म्हणून यम स्वतः दारात उभा होता ,यमाने रजनीकांतला लगेच ओळखला, 
यम : तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे. 
रजनीकांत (मस्करीत ): नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ . 
यम ( गोंधळून): अरे चित्र्या , टायटानिक बुडाली होती कि जळाली होती ? 
----------
 
वडील : मुला, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि Autograph मध्ये बदलते. मुलगा : नाही बाबा, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि chevas regal किंवा black label मध्ये बदलते.

Tuesday, February 21, 2012

सप्तपदीचे सात मंत्र

संसार सुखी करायचा असेल तर "सप्तपदीचे सात मंत्र' दोघांनीही अमलात आणावेत.

1) एकमेकांबद्दल प्रेम, विश्‍वास आदर बाळगा

2) समोरच्याने बदलण्याची अपेक्षा न धरता स्वतःत बदल घडवा

3)ज्या दिवशी भांडण होईल, "त्याच' दिवशी मिटवा (अबोला धरू नका). बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला.

4) स्वतःसाठी वेळ द्या.

5) एकमेकांना वेळ द्या (दोघेच फिरायला जा. गप्पा मारा.)

6) "इगो' सोडा (पुरुषीपणाचा, स्त्रीत्वाचा, पैशाचा, पदाचा इत्यादी)

7) प्रेम आहेच; पण ते व्यक्त करणेही खूप गरजेचे असते. छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून काळजी, आधार, कौतुक, प्रेम हे भाव व्यक्त होऊ द्या (उदाहरणार्थ ः आय लव्ह यू, तू आज छान दिसतोस, किती दमलीस तू...इत्यादी)

संसार सुखी असेल तर घरात सुख-समाधान व शांती नांदेल.
मग दिवसभर कुठेही असा;
संध्याकाळी सगळ्यांनाच घरी परतण्याची ओढ असेल;
पण तरीही वाढत्या जबाबदाऱ्यांचे व कामामुळे येणाऱ्या तणावांचे पडसाद आपल्या व्यक्तींवर उमटणारच.

कधीतरी वाद होणारच; पण त्यांचे प्रमाण असेल "जेवणातल्या मिठाएवढेच!'

Friday, January 20, 2012

Ka Bhandawe (Short lekh)

ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ....
तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून... बोल.. मी तर भांडणार...
ती: किती नालायक आहेस... काय मिळतं तुला माझ्याशी भांडून...
तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का... "कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...
ती: हो ऐकलय...
... तो: पण तसं काहीही नाहीये ;)....
ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...
तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक...

मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...

मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...

मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुल बोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...

मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...

अन

मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय 'क्षणांसाठी'...

Sunday, October 23, 2011

Happy Diwali

Saturday, October 22, 2011

Prem kaay asta? Marathi lekh

मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ? मी त्याला सागितले की, कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.... दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.... कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.... कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम... पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.... आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम....

Marathi Charoli आठवणी

आठवणी सांभाळणं खूप सोपं असत,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात,
पण क्षण संभाळण खूप कठीण असत,
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात.

Tuesday, October 11, 2011

Kaahi shabda - Yashaswi hone

काही माणस स्वप्नात रमतात,
काही वास्तव्याशी सामना करतात ,
पण यशस्वी तेच ठरतात,
जे परिस्थितीचा सामना करून स्वप्नांना सत्यात उतरवतात .......!!!!!!!!!

Sunday, July 17, 2011

Free Marathi Friendship greeting cards

A nice selection of marathi greeting cards / wallpapers from the web on the topic of friendship / Maitri. To save the images, first click on them to enlarge, and only then right click on each of the images and select "save as".









Friday, July 15, 2011

Guru pournime chya shubhechha! Happy Guru pournima

गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर: |
गुरु साक्षाथ परम्ब्रःमा तस्मैश्री गुरवे नमः ||

काही मजेशीर व्याख्या - Kaahi majeshir wyakhya (funny)

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या.

बघा आवड्तायेत का?

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)
ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना
मिसळपाव.कॉम - जगातील सर्व 'नमुन्यांचे' एकत्रित पणे टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा

Wednesday, July 13, 2011

Poem: Aashru yet naahit

आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण...पण...अश्रु येत नाही!
जशी शरीरावर ऐखादी जखम झाल्यावर, त्यावरची खपली गळूनं पडते,
पण डाग मात्र कायम रहातो, तूझ्या आठवणीची खपली कधीच गळून पडली,
पण...पण...मनावर डाग मात्र कायम राहीला. अगदी मरेपर्यन्त,
आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण.......पण....अश्रु येत नाही...!
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥