सारसबागेत गणपतीला
घातला जेव्हा स्वेटर
फुटपाथवरचा ग़रीब म्हणे
मी काय मारले खेटर
बाप्पा तुझा जन्म मुळचा
बर्फामध्येच झाला
तरीसुद्धा भक्ताला त्या
तुझा पुळका आला
ठाऊक आहे मला
की माझं नशिब खोटं
नि स्वेटर घालणा-याचं पोट
तुझ्यासारखंच मोठं
मला वाटलं होत तुला
थंडी वाजत नाही
नि माझ्या भिका-याच्या भांड्यात
नाणं वाजत नाही
नोटाबंदीमुळे आता
नाणं सुद्धा मोठं
नि भीक देणा-याचं मन
झालं की रे छोटं
तुझ्यासाठी नेपाळ्याचा
स्वेटर विकला गेला
नि त्याच फुटपाथवरती
माझी जीव गारठून मेला
ज्याने तुला स्वेटर घातला
त्याचे करशील ना रे भले
माझ्या सारखे किती तरी
जरी गेले मेले
तुझी भक्ती म्हणजे काय
ती कधीच कळली नाही
आजवरती तुझी माझी
वीणच जुळली नाही
घरात स्वेटर घालुन संजय
रचेल यांवर काव्य
नि सोशल मिडियावर त्याचे
कौतुक होईल भव्य
मला याची सवय आहे
मी असाच जगतो आहे
नि अंगावरती उन्हं यायची
वाट बघतो आहे
डाॅ. संजय उपाध्ये
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Showing posts with label marathi kawita. Show all posts
Showing posts with label marathi kawita. Show all posts
Monday, December 12, 2016
Monday, November 4, 2013
Ayushya - Chaar oli
Yevdhyasha Aayushyat khuuup kahi hava asata,
Pan je hava asata tech milat nasta,
Hava te milala tari khuuup kahi kami asata.....
Chandanyani bharun suddha aapala aabhal matra rikamch asata....
Pan je hava asata tech milat nasta,
Hava te milala tari khuuup kahi kami asata.....
Chandanyani bharun suddha aapala aabhal matra rikamch asata....
![]() |
| Ayushya Kawita - marathi wallpaper - Click on the image for larger size and to download |
Labels:
char oli,
kawita,
life,
marathi,
marathi kawita,
marathi poem,
marathi wallpapers,
marthi wallpapers,
nice words,
philosophy,
vichar
Sunday, November 25, 2012
Tujhya Wina - Marathi Poem
Labels:
dedication,
greeting,
kawita,
love,
marathi,
marathi kawita,
picture,
poem,
prem,
tujhya wina,
words
Wednesday, July 13, 2011
Poem: Aashru yet naahit
आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण...पण...अश्रु येत नाही!
जशी शरीरावर ऐखादी जखम झाल्यावर, त्यावरची खपली गळूनं पडते,
पण डाग मात्र कायम रहातो, तूझ्या आठवणीची खपली कधीच गळून पडली,
पण...पण...मनावर डाग मात्र कायम राहीला. अगदी मरेपर्यन्त,
आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण.......पण....अश्रु येत नाही...!
Wednesday, June 1, 2011
Olakhla ka sir
ओळखलत का सर मला ? पावसात आला कोणी ...
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी …
क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून ..
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून …
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली ..
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली …
भिंत खचली , चूल विझली, होते नव्हते नेले ..
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले …
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे ..
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे …
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला ..
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला …
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..
पाठीवरती हात ठेऊन नुसते 'लढ' म्हणा

Sunday, March 20, 2011
सौमित्र : शेवटची निघून जाताना
तू निघून चाल्लीयेस कायमची हे कळल्यावर
अचानक लक्षात येतंय
तुझ्यावर लिहिणार होतो मी एक प्रेमकविता
तुझ्या नुस्त्या आसपास असण्यादिसण्यानेच जणू
आपोआप उमटत जातील ओळी कुठल्यातरी कागदावर
इतके माझे डोळे तुझे झाले होते
अचानक लक्षात येतंय
तुझ्यावर लिहिणार होतो मी एक प्रेमकविता
तुझ्या नुस्त्या आसपास असण्यादिसण्यानेच जणू
आपोआप उमटत जातील ओळी कुठल्यातरी कागदावर
इतके माझे डोळे तुझे झाले होते
Tuesday, December 28, 2010
Mala kuni sangel ka prem kase karayche? (Marathi poem)
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत

Subscribe to:
Posts (Atom)
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥