तुझ्या विना (Shabda)
तुझ्या विना.... तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना....
भास का हा तुझा होतसे मला सांगना
लागते ओढ का सारखी अशी सांगना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
भास का हा तुझा होतसे मला सांगना
लागते ओढ का सारखी अशी सांगना
झाले अनोळखी माझी मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
उमझून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांगणा जीव हा गुंतला
झाले आता जरी
होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
(वैशाली सामंत:)
वाट होते माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली..
फिरुनी पुन्हा नवे
नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Tuesday, August 7, 2012
Marathi song lyrics: Ka kale na (mumbai pune mumbai)
उमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे
एक मी एक तू शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू , सत्यात तू , साऱ्यात तू
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे
घडले कसे कधी कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठावरी
दे न तू साथ दे
हातात हात दे
नजरेतना नजरेतुनी इकरार दे
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे
Labels:
bandha julati,
harawte man case,
he preetiche,
ka kalena,
kontya kshani,
lyrics,
marathi,
meaning,
movie,
mumbai pune mumbai,
song,
translation,
words
Thursday, May 31, 2012
Marathi jokes (katta)
शिक्षक : एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २ भिंती बांधायला किती खर्च येईल?
विद्यार्थी : १०० करोड.
शिक्षक : नालायक, तुझ्या बापाच नाव काय?
विद्यार्थी : सुरेश कलमाडी.
----------
Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली .उंदीर लगेच केककडे धावला . सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली , पुन्हा तोच प्रकार. सरांनी पदार्थ बदलून पहिले , उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.
सर : यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही.
एवढ्यात पक्क्या ओरडला , "सर , एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना ."
------------
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले , "अगं , आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं ?"पत्नी : कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता ? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन? गोपाळराव : तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात ...अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत .
----------
लाईट आल्यावर खोलीतील देशस्थ आणि कोकणस्थ कसा ओळखावा ?
लाईट आल्यावर "आले " म्हणून आनंदाने चित्कारतो तो देशस्थ , ... आणि जो लगेच मेणबत्तीवर फुंकर मारतो तो कोकणस्थ.
----------
शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवला, पण गाढव पाणीच प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात? चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो .
----------
वडील : अरे, एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो .मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!
----------
रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता , लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला, म्हणून यम स्वतः दारात उभा होता ,यमाने रजनीकांतला लगेच ओळखला,
यम : तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे.
रजनीकांत (मस्करीत ): नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ .
यम ( गोंधळून): अरे चित्र्या , टायटानिक बुडाली होती कि जळाली होती ?
----------
वडील : मुला, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि Autograph मध्ये बदलते. मुलगा : नाही बाबा, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि chevas regal किंवा black label मध्ये बदलते.

Tuesday, February 21, 2012
सप्तपदीचे सात मंत्र
संसार सुखी करायचा असेल तर "सप्तपदीचे सात मंत्र' दोघांनीही अमलात आणावेत.
1) एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास आदर बाळगा
2) समोरच्याने बदलण्याची अपेक्षा न धरता स्वतःत बदल घडवा
3)ज्या दिवशी भांडण होईल, "त्याच' दिवशी मिटवा (अबोला धरू नका). बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला.
4) स्वतःसाठी वेळ द्या.

5) एकमेकांना वेळ द्या (दोघेच फिरायला जा. गप्पा मारा.)
6) "इगो' सोडा (पुरुषीपणाचा, स्त्रीत्वाचा, पैशाचा, पदाचा इत्यादी)
7) प्रेम आहेच; पण ते व्यक्त करणेही खूप गरजेचे असते. छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून काळजी, आधार, कौतुक, प्रेम हे भाव व्यक्त होऊ द्या (उदाहरणार्थ ः आय लव्ह यू, तू आज छान दिसतोस, किती दमलीस तू...इत्यादी)
संसार सुखी असेल तर घरात सुख-समाधान व शांती नांदेल.
मग दिवसभर कुठेही असा;
संध्याकाळी सगळ्यांनाच घरी परतण्याची ओढ असेल;
पण तरीही वाढत्या जबाबदाऱ्यांचे व कामामुळे येणाऱ्या तणावांचे पडसाद आपल्या व्यक्तींवर उमटणारच.
कधीतरी वाद होणारच; पण त्यांचे प्रमाण असेल "जेवणातल्या मिठाएवढेच!'
Friday, January 20, 2012
Ka Bhandawe (Short lekh)
ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ....
तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून... बोल.. मी तर भांडणार...
ती: किती नालायक आहेस... काय मिळतं तुला माझ्याशी भांडून...
तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का... "कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...
ती: हो ऐकलय...
... तो: पण तसं काहीही नाहीये ;)....
ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...
तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक...
मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुल बोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...
अन
मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय 'क्षणांसाठी'...

Tuesday, October 25, 2011
Sunday, October 23, 2011
Saturday, October 22, 2011
Prem kaay asta? Marathi lekh
मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ? मी त्याला सागितले की, कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.... दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.... कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.... कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम... पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.... आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम....
Marathi Charoli आठवणी
आठवणी सांभाळणं खूप सोपं असत,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात,
पण क्षण संभाळण खूप कठीण असत,
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात.
कारण त्या मनात जपून ठेवता येतात,
पण क्षण संभाळण खूप कठीण असत,
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात.
Tuesday, October 11, 2011
Kaahi shabda - Yashaswi hone
काही माणस स्वप्नात रमतात,
काही वास्तव्याशी सामना करतात ,
पण यशस्वी तेच ठरतात,
जे परिस्थितीचा सामना करून स्वप्नांना सत्यात उतरवतात .......!!!!!!!!!
Sunday, July 17, 2011
Free Marathi Friendship greeting cards
A nice selection of marathi greeting cards / wallpapers from the web on the topic of friendship / Maitri. To save the images, first click on them to enlarge, and only then right click on each of the images and select "save as".
Friday, July 15, 2011
Guru pournime chya shubhechha! Happy Guru pournima
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर: |
गुरु साक्षाथ परम्ब्रःमा तस्मैश्री गुरवे नमः ||
काही मजेशीर व्याख्या - Kaahi majeshir wyakhya (funny)
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या.
बघा आवड्तायेत का?
अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)
ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना
मिसळपाव.कॉम - जगातील सर्व 'नमुन्यांचे' एकत्रित पणे टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा
Wednesday, July 13, 2011
Poem: Aashru yet naahit
आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण...पण...अश्रु येत नाही!
जशी शरीरावर ऐखादी जखम झाल्यावर, त्यावरची खपली गळूनं पडते,
पण डाग मात्र कायम रहातो, तूझ्या आठवणीची खपली कधीच गळून पडली,
पण...पण...मनावर डाग मात्र कायम राहीला. अगदी मरेपर्यन्त,
आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण.......पण....अश्रु येत नाही...!
Wednesday, June 1, 2011
Olakhla ka sir
ओळखलत का सर मला ? पावसात आला कोणी ...
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी …
क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून ..
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून …
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली ..
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली …
भिंत खचली , चूल विझली, होते नव्हते नेले ..
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले …
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे ..
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे …
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला ..
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला …
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..
पाठीवरती हात ठेऊन नुसते 'लढ' म्हणा

Subscribe to:
Posts (Atom)
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥