Showing posts with label ka. Show all posts
Showing posts with label ka. Show all posts

Thursday, May 21, 2009

Lyrics Kuni Jal/Jaal Ka Sangal Ka (कुणी जाल का सांगाल का)

गीत : कवी अनिल
संगीत : यशवंत देव
गायक : डॉ. वसंतराव देशपांडे

कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या कोकिळा …(२)
रात्री तरी गाऊ नको …(२)
खुलावु नको अपुला गळा || ध्रु ||

आधीच संध्याकाळची …(२)
बरसात आहे लांबली
परत जाता चिम्ब चुम्बन …(२)
देत करे थांबली
भार पुर्वीचा दिला
तो श्वास चाहुन वाळला . …(२)
आत्ताच आभाळातला …(२)
काळोख मी कुरवाळीला || १ ||
कुणी जाल का सांगाल का



English Version :

Lyricist : Kavi Anil
Music Director : Yashavant Dev
Singer : Dr. Vasantarao Deshpande

Kuni jaal ka sangal ka
Suchawal ka tya kokila …(2)
Ratri tari gau nako …(2)
Khulawu nako apula gala ||

Adhich sandhyakalachi …(2)
Barasat aahe lambali
Parat jata chimb chumban …(2)
Det kare thambali
Bhar purvicha dila
To shwas chahun walala. …(2)
Attach abhalatala …(2)
Kalokh mi kurawalila || 1 ||
Kuni jaal ka sangal ka

Lyrics Sang Tu Majha/maajha Hoshil Ka (सांग तू माझा होशील का)

चित्रपट : लाखाची गोष्ट
गीत : ग दि माडगुळकर
संगीत : सुधीर फडके
गायिका : आशा भोसले

सांग तू माझा होशील का
होशील का …(२)
वसंत काळी वनी दिनांती
एकच पुशिते तुज एकांती …(२)
एकांती पर कोमल माझा
हाती घेशील का
माझा होशील का
होशील का …(२)

नसेल माहित तुला कधी ते …(२)
रोज तुझ्या मी स्वप्नी येते …(२)
त्या स्वप्नांच्या आठवणी या
ओठा देशील का || १ ||
माझा होशील का
होशील का …(२)
सांग तू माझा होशील का ...



English Version :

Movie : Lakhachi Goshta
Lyricist : Ga Di Madagulakar
Music Director : Sudhir phadake
Singer : Asha bhosale


Sang tu majha hoshil ka
Hoshil ka …(2)
Wasant kali wani dinanti
Ekach pushite tuj ekanti …(2)
Ekanti par komal majha
Hati gheshil ka
Majha hoshil ka
Hoshil ka …(2) ||

Nasel mahit tula kadhi te …(2)
Roj tujhya mi swapni yete …(2)
Tya swapnanchya athawani ya
Otha deshil ka || 1 ||

Majha hoshil ka
Hoshil ka …(2)
Sang tu majha hoshil ka

Saturday, April 25, 2009

Lyrics "Bagh majhi athawan yete ka..."

........ बघ माझी आठवण येते का? ...........

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?
वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत,
बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल,
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण,
तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे ,
तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर,
किशोरीच सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ,
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?

After this, it plays "Pausa datalela"

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥