Showing posts with label rajashree. Show all posts
Showing posts with label rajashree. Show all posts

Saturday, April 25, 2009

Lyrics "Paus padun gelyawar..."

.................. पाउस पडून गेल्यावर ................
पाउस पडून गेल्यावर मन पागोल्यांगत झाले …2
क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रंगत गेले
थेम्बाना सावरलेल्या त्या गवताच्या काडयाचा
पाउस पडून गेल्यावर मी भिजलेल्या झाडांचा
पाउस पडून गेल्यावर मन थेम्बांचे गारांचे
आईस चकवून आल्या त्या डबक्यातील पोरांचे
मोडून मनाची दारे ही ओली पाउल भरती
पाउस पडून गेल्यावर या ओल्या रस्त्यांवरती
पाउस पडून गेल्यावर मी चंद्र चिंम्ब भिजलेला …2
भिजवून चांदण्या साऱ्या विझलेला शांत निजलेला
पाउस पडून गेल्यावर मन फिरफिरता पारवा
पाउस पडून गेल्यावर मन गारठता गारवा

After this, it plays "Garava"

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava

Lyrics "Bagh majhi athawan yete ka..."

........ बघ माझी आठवण येते का? ...........

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?
वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत,
बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल,
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण,
तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे ,
तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर,
किशोरीच सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ,
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?

After this, it plays "Pausa datalela"

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava

Lyrics "Tyala paus awadat nahi..."

............ त्याला पाऊस आवडत नाही ...............
त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे भिजरी पाऊलवाट पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सुटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं...(2)
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते...(2)
पावसासकट आवडावी ती म्हणुन ती ही झगडते.
रुसून मग ती घून जाते िभजत राहते पावसात...(2)
रुसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असत ओल्याचिम्ब दिवसात.

After this, it plays "Zhadakhali basalele"

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava

Lyrics "Punha dhag datun yetat..."

.......... पुन्हा ढग दाटून येतात ................

पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात
पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी.........

After this, it plays "Punha pawasalach sangayache"

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava

Lyrics "Pani jharata chalale..."

........... पाणी झरत चालले ...........
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
पाणी झरत चालले झाड झाडाच्या मिठीत
आता झाडाच्या भवती रान आगीच्या धगीत
पाणी झरत चालले नदी सागर भरती
वाळू ओलावुन सारी दोन्ही किनार्यावरती
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान...(2)
आता किलबिलताहे झाडाझाडातून पान
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले

After this, it plays "Gaar wara ha bharara"

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava

Lyrics "Pahila Paus..."

.......... पहिला पाउस ...............

पहिला पाउस पहिली आठवण
पहिल घरटं पहिल आंगण
पहिली माती पहिला गंध
पहिल्या मनात पहिलाचा स्पंद
पहिल आभाळ पहिल रान
पहिल्या झोळीत पहिलच पान
पाहिले तळहात पहिल प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेम्ब
पहिलाच पाउस पहिलीच आठवण
पहिल्या घरट्याच पहिलच आंगण

After this, it plays "Rima jhima dhuna"

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava

Lyrics "Una jara jasta aahe...."

............. ऊन जरा जास्त आहे ................

ऊन जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं
भर उन्हात पाउस घेउन आभाळ मनात दाटतं
तरी पावलं चालत रहातात मन चालत नाही
घामािशवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही

िततक्यात कुठून एक ढग सुर्यासमोर येतो …2
उन्हामधला काही भाग पंखान खाली घेतो

वारा उनाड मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो
पाना फुला झाडावरती छ्परावरती चढून पाहतो
दुपार टळुन संध्याकाळ्चा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हामागुन चालत येते गार गार कातर वेळ

चक्क डोळ्यांसमोर ऋतु कुस बदलून घेतो
पावसाआधी ढगान मधे कुठून गारवा येतो

After this, it plays "Garava"

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava

Complete Lyrics of "Garava" by Milind Ingale

" ये है प्रेम " च्या यशस्वी पदार्पणानन्तर , मिलिंद इंगले ह्यांचा " गारवा "
हा राजश्री प्रोडक्शनचा मराठीत खुप गाजलेला अल्बम आहे.
यातील सर्व गाणी प्रेमिकांच्या मनातली विविध रूपं दाखवून
रसिक श्रोत्याना चिम्ब भिजवुन टाकतील यात शंकाच नाही.

ह्या अल्बम मधील सर्व गाणी आणि कविता संपूर्ण Lyrics
सोबत रसिकांसाठी घेउन आलो आहोत फक्त "ऋतु हिरवा" वर.


1) ऊन जरा जास्त आहे
2) पहिला पाउस
3) पाणी झरत चालले
4) पुन्हा ढग दाटून येतात
5) त्याला पाऊस आवडत नाही
6) बघ माझी आठवण येते का?
7) पाउस पडून गेल्यावर
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥