Showing posts with label aahe. Show all posts
Showing posts with label aahe. Show all posts

Tuesday, May 19, 2009

Lyrics Kahi/Kaahi Bolayache Ahe/Aahe (काही बोलायाचे आहे)

अल्बम : श्रीधर फडके - स्पेशल
गीत : कुसुमाग्रज
संगीत : यशवंत देव
गायक : श्रीधर फडके

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही || ध्रु ||

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही || १ ||

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही || २ ||

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही || ३ ||

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही || ४ ||

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही || ५ ||


English Version :

Album: Shridhar Phadake -Special
Singer : Shridhar Phadake
Music Director : Yashwant Dev
Lyricist : kusumagraj

Kahi bolaiche aahe pan bolanar nahi
Devlaat daramadhe bhakti tolnar nahi ||

Mazya antrat ganh kalp kusumancha date
Pan pakali tayachi kadhi fulnar nahi ||1||

Nakshtranchya gawatale mala gawasale guj
Pari akshrancha sang tyla milanar nahi ||2||

Megh jambhala ekala rahe nabhachya kadela
Tyache rahasya kadhi konala kalanar nahi ||3||

Door bandrat ubhe ik galbat ruperi
Tyacha kosh kinaryas kadhi disnar nahi ||4||

Tuzhy krupakatakshane jhaho wanawycha dhani
Tyachy nikharyat kadhi tula jalnar nahi ||5||

Saturday, April 25, 2009

Lyrics "Una jara jasta aahe...."

............. ऊन जरा जास्त आहे ................

ऊन जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं
भर उन्हात पाउस घेउन आभाळ मनात दाटतं
तरी पावलं चालत रहातात मन चालत नाही
घामािशवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही

िततक्यात कुठून एक ढग सुर्यासमोर येतो …2
उन्हामधला काही भाग पंखान खाली घेतो

वारा उनाड मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो
पाना फुला झाडावरती छ्परावरती चढून पाहतो
दुपार टळुन संध्याकाळ्चा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हामागुन चालत येते गार गार कातर वेळ

चक्क डोळ्यांसमोर ऋतु कुस बदलून घेतो
पावसाआधी ढगान मधे कुठून गारवा येतो

After this, it plays "Garava"

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥