Tuesday, December 13, 2016

Saint Gnyaneshwar - Suvichar

ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार : -

१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
                ---------  संत ज्ञानेश्वर🌹


२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
                --------- संत ज्ञानेश्वर🌹

३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
                  --------संत ज्ञानेश्वर🌹

४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
                  --------- संत ज्ञानेश्वर🌹

५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
                 --------- संत ज्ञानेश्वर 🌹

६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
                   ---------  संत ज्ञानेश्वर 🌹

७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
                  ---------  संत ज्ञानेश्वर 🌹

८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
                    --------- संत ज्ञानेश्वर 🌹

९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे,
                ---------  संत ज्ञानेश्वर🌹

१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधीb मी गमावता कामा नये.
                  ---------  संत ज्ञानेश्वर

Monday, December 12, 2016

Marathi Suvichar - Swabhawala Aushadh

⁠[9:42 PM, 12/9/2016] Aai Borivali: ⁠⁠⁠🌹🐾🐾🇮🐾🐾🌹 🙏स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायच असतं..॥👏 अधिरातला 'अ' सोडून, थोडं धिरानं घ्यायच असतं ॥👏 संतापातला 'ताप' सोडून, मनाला संत करायच असतं ॥👏 मनातला हट्ट सोडून, नात घट्ट करायच असतं॥👏 माझ्यातला मी सोडून, तिच्यातला 'ती'ला जपायच असतं ॥👏 आपलं बोलणं सोडून कधी, समोरच्याचही ऐकायच असतं ॥👏 एकाच दिवशी नाही तरी, हळू हळू बदलायचं असतं ॥👏 थोडं थोडं का होईना, रोज प्रेम मात्र द्यायच असतं ॥👏 एकाचा राग दुसऱ्यावर न काढता, समोरच्याला समजून घ्यायचं असतं ||👏 स्वभावाला औषध असतं, फक्त ते रोज घ्यायच असतं !!👏 🙏 शुभ सकाळ 🙏 🍀🍀🌹🌻🌹🍀🍀
⁠⁠⁠⁠9:42

Bewada - Marathi Joke

एका बेवड्याने
मित्रांसाठी पार्टि करायचे
ठरवले...🍖🍗
आणि पार्टि साठी आपल्याच
घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐
त्यांनी बकरा चोरला पण
आणि मित्रांसोबत मनसोक्त
पार्टि केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय
काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :-
हा बकरा इथे कसा..???
बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???🐕


हसू नका  !!!!!!!
पुडे पाठवा नवीन आहे
😂😂😂😂😂😜

Sanjay Upadhye Short Poem - thoughts

सारसबागेत गणपतीला
घातला जेव्हा स्वेटर
फुटपाथवरचा ग़रीब म्हणे
मी काय मारले खेटर

बाप्पा तुझा जन्म मुळचा
बर्फामध्येच झाला
तरीसुद्धा भक्ताला त्या
तुझा पुळका आला

ठाऊक आहे मला
की माझं नशिब खोटं
नि स्वेटर घालणा-याचं पोट
तुझ्यासारखंच मोठं

मला वाटलं होत तुला
थंडी वाजत नाही
नि माझ्या भिका-याच्या भांड्यात
नाणं वाजत नाही

नोटाबंदीमुळे आता
नाणं सुद्धा मोठं
नि भीक देणा-याचं मन
झालं की रे छोटं

तुझ्यासाठी नेपाळ्याचा
स्वेटर विकला गेला
नि त्याच फुटपाथवरती
माझी जीव गारठून मेला

ज्याने तुला स्वेटर घातला
त्याचे करशील ना रे भले
माझ्या सारखे किती तरी
जरी गेले मेले

तुझी भक्ती म्हणजे काय
ती कधीच कळली नाही
आजवरती तुझी माझी
वीणच जुळली नाही

घरात स्वेटर घालुन संजय
रचेल यांवर काव्य
नि सोशल मिडियावर त्याचे
कौतुक होईल भव्य

मला याची सवय आहे
मी असाच जगतो आहे
नि अंगावरती उन्हं यायची
वाट बघतो आहे

डाॅ. संजय उपाध्ये

Marathi Short Story

ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते.
पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.
"बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना" आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले.
एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.
"ओ आजोबा नीट घेऊन खा की?" मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे.

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला.
"काळजी करू नकोस, बाबा सापडले!!" कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!
त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली.

"काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???"
त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले.
"हे आजोबा कोण आहेत तुमचे?" मी विचारले.
"वडील आहेत माझे." त्याचे उत्तर.
"त्यांना काही त्रास आहे का?" माझा पुढचा प्रश्न.
"हो त्यांना अल्झायमर आहे."
अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता.
" मग हे आजोबा असे कुठेही जातात का?"
" हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत."
मी शॉकच झालो.
"मग तुम्ही यांना शोधता कसे?"मी विचारले.
"आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी."
"असे वारंवार होत असेल" मी आश्चर्याने विचारले.
तो स्मितहास्य करून म्हणाला "महिन्याला एक दोन वेळेस"
"काळजी घ्याआजोबांची! बाप रे काय हा वैताग" मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, "बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं."

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.            

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.
उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो...                

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!

वरील संदेश माझ्या कडे एका शाळकरी मित्राने पाठवला,  मला आवडला म्हणून आपल्याला पाठवला आहे.

Dutta Jayanti thoughts - Marathi

🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹
🌹दत्त जयंतीच्या शुभेच्छा🌹
🌹 दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ🌹
🚩१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’
याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक
जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव
आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.
आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण
प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव
जागृत करण्याचा आपण निश्चय करूया....

🚩२] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास
करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास
करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण
‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच
आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट
करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’

🚩३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे
असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व
दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर
ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य
जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच
आपल्यावर त्याची कृपा होईल .  

 🙏 ॐ जय गुरुदेव दत्त 🙏

     🌼🌷🌼🌷🌼🌷🌼

दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

🚩४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय
ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू
आपणाला जे हवे, ते सर्व देते.
पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…

🚩५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४
वेदांचे प्रतीक आहेत.…

🚩६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व
अधिक आहे.…

🚩७] मूर्तीविज्ञान:
दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे
आहे
🚩८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…

🚩९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…

🚩१०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…

🚩११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन
दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.

 💐💐💐🌼🌼💐💐💐

Dutta Jayanti sayings Marathi

सकल पालनहारा..
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!!


नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!

 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥