Wednesday, June 3, 2009

Lyrics Kanhu Gheun/Ghevun/Ghewun Jay - Maake/Mage Bole May(कान्हू घेउन जाय)

गीत : शांता शेळके
संगीत : मीना मंगेशकर
गायिका : उषा मंगेशकर

कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय 
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय || ध्रु ||

म्हणे माझ्या लेकरा रे माझ्या वासरा रे
उशीर नको लावू वेगे परत घरी ये रे
हाती राहे खीर लोणी कोण दुजे खाय ?
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय || १ ||

डोळ्यांतली बाहुली तू राजा सोन्या रे
ओंजळीत आला जणू चैत चांदवा रे
सूर्य येता माथी तुझे पोळतील पाय !
संगे चाले श्रीराम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय || २ ||
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥