Wednesday, June 17, 2009

Lyrics Visaroo/Visaru Nako Shreerama/Shrirama Mala (विसरु नको श्रीरामा मला)

योगिता गोडबोले ह्यानी तब्येत बरी नसतानाही "सा रे ग म प" च्या मंचावर हे सुन्दर गाणे गाउन परिक्षकांची शाबासकी मिळवली.
हृदयनाथ मंगेशकर ह्यानी ह्या गाण्याची आठवण सांगताना एक किस्सा सांगितला. त्याना ह्या गाण्यासाठी संगीत दिग्दर्शनाचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळालेले होते. परन्तु ह्या गाण्याची मुळ रचना त्यांचे एक मित्र "के महावीर" ह्यांची असल्याची कबुली सर्व प्रेक्षकांसमोर देऊन त्यानी आपल्या प्रतीचा आदर दुणावला आहे. "के महावीर" हे गायक, संवादिनी वादक, कत्थक घराण्याचे नृत्यक असून त्यांच्या "आंख से आंख मिलाता है कोई" सारख्या गजल्स प्रसिद्ध आहेत असे पंडितजींनी कार्यक्रमात सांगितले.


चित्रपट : जानकी
गीत : सुधीर मोघे
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
गाियका : लता मंगेशकर


विसरु नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया || ध्रु ||

किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले
घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया || १ ||

तू सांब भोळा उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते
आपुले वेगळे जुळे श्यामला प्रिया || २ ||

कसे दान आले रित्या ओंजळीत
तुज्याविन झाले अभागी अनाथ
तुज्या अन्कुरासाठी
सोसते झेलते उन्हाच्या झळा || ३ ||


English Version :

Movie : Jaanaki
Lyricist : Sudheer Moghe
Music Director : Hridayanath Mangeshakar
Singer : Lata Mangeshakar

Visaroo nako shriramaa mala
Mi tuzyaa pauli jeev vahila
Priya... ||

Kitee janm jhale tuzee premika mee
Kitidaa navyaane tulaa bhetale mee
Tujhi saavali jhale
Ghevuni hindale satichaa vasaa || 1 ||

Tu samb bholaa umaa parvati mee
Tu krushn kala tujhi radhika mee
Yugayugaanche nate
Apule vegale jule shyamalaa || 2 ||

Kase dan ale rityaa onjalit
Tuzyaavin jhale abhaagi anaath
Tuzyaa ankoorasathi
Sosate jhelate unhachyaa jhala || 3 ||
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥