Showing posts with label marathi lekh. Show all posts
Showing posts with label marathi lekh. Show all posts

Sunday, December 29, 2019

Pune Jokes - अचाटबुध्दी संपन्न पुणेकर


😜 अचाटबुध्दी संपन्न पुणेकर ! 😜
*****
पुण्यात विकल्या जात असलेल्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्यं असावेच लागते.

😜 खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण . .
‘आमचे येथे रसाळ खजूर मिळतील’
हे फक्त पुण्यात !

😜 एरवी जर्दाळू सगळीकडे ..
पण “पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात !

😜 केशरात ‘असली’ केशर फक्त पुण्यात.

😜 सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या
भारतात असली ..तरी ‘वेलचीयुक्त चहा’ ही पाटी फक्त पुण्यात दिसते.

😜 परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली -
‘गणपती कारखाना’ पण तेच पुण्यात बघितले तर
“आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मुर्ती मिळतील”!

😜 एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना
“चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतिच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट” अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेनं दुकानात शिरलो. उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहीलाय की काय?

चौकशी अंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबानं मजकूरात बदल नाही.

😜 शनिपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा मजकूर वाचून मी कोलमडायच्याच बेतात होतो..
ती पाटी म्हणजे “येथे टिकाऊ आणि दर्जेदार जानवीजोड मिळतील” !!!!

😜 आणि अजुन एक ..
"आमच्याकडे दणकट पायजमा आणी मुलायम बंडी मिळतील" अशी ही पाटी होती.

पुण्यात याची देही याची डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या

😜 येथे खास मालवणी पद्धतीने बनवलेले ओरिजनल चायनीज मिळेल.

पुढील अजुन कहर...

😜 येथे सेकंडहॅंड कवळ्या स्वस्तात मिळतील !!!!

😜 येथे गेलेल्या फटाक्यांना वाती लाउन मिळतील !

Climax ...

😜 एका दुकानात "येथे वैकुंठालंकार मिळतील"
असे लिहिले होते. मी उत्सुकतेने पाहिले की काय असेल तिथे तर काय सांगू!

अंत्यविधीला लागणा-या सामानाचे ते दुकान होते

अचाट बुध्दीचे धनी असणाऱ्या सर्व पुणेकरांना समर्पित!

Saturday, December 8, 2012

Nostalgia war ek lekh


"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावामग लक्षात येतंकी आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाहीजत्रेतमिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाहीचटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाहीसर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाहीतसंचकापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाहीकापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाहीआता त्या ट्रिप्सनाहीतदोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाहीविटी दांडू नाहीसाबणाचे फुगे नाहीतप्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्या म्हातारीने हे सगळे आनंदनेलेत्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलंम्हणूनच ती अजून उडू शकतेआपण जमिनीवरच आहोत."
वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.
लाटेने कि काळाने नेला तो किनार्यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....
गेले कुठे ते चालताना "पॅकपॅकआवाज करणारे पायातले बूट?
"
मी नाही देणार जा माझं चॉकलेटम्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...
हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताईदाखवत आईने भरवलेला...घरात  सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
    पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......

खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा नाआयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होतेपण बालपणीच्या काही आठवणीमनाच्या कोपर्यात अजुनहीदाटलेल्या असतातत्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होतेआपलं मनही किती विचित्र असतं नाजेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटतेशाळा सोडुनबाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतंमुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतंमात्र आता मोठेझाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.
पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे  वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले...

Saturday, May 28, 2011

Jiwhala ki ektepana

आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जिव्हाळा (an attachment ), अतिशय दुख होते जेव्हा आपण तो घालवुन बसतो .... सर्व काही असून नसल्या सारखे वाटते .... नाहिका ?? :( , आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकटेपणा (a loneliness), कारण ह्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळते,........ आणि जेव्हा आपण तो घालवुन बसतो,.... ♥ आपल्याला सर्व काही मिळते ♥ .... नाहिका ?? .....

Monday, May 23, 2011

Marathi Lekh: हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता?

तर हि गोष्ट आहे….,
संत एक नाथांची एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.
शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….?
असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :
१- नाथ किती महान होते ते कळत
२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते
३ - माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत
४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका
५ - रागावून त्रास तुम्हालाच
६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच
७ - दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे

अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता. शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण, नाथांची हि गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस….,
“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “.
शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”.
तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि,
नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण .

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता ...

स्वातंत्र्य वीर विनायक सावरकर दामोदर

!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!!
II मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

Sunday, March 20, 2011

घटना (Ghatana) - दॄष्टीकोन

घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.

Wednesday, March 9, 2011

कामाचा ताण :एक आसन

कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी...........कामाचे ओझे जास्त असल्यास खालील आसनाचा प्रयोग करुन पहा....कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल
१) प्रथम टेबलावरील काम थोडे बाजुला करावे...
२) ते जमत नसल्यास तुमची खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्या..
३) डोळे मिटा..हात डोक्या मागे घ्या
४) दीर्घ श्वास घ्या
५) श्वास हळू सोडा ( असे पाच वेळा करा)
६) पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या ( डोळे बंदच राहु द्या
७) या वेळी श्वास जोरात सोडा
८) श्वास सोडताना हात झटका
९) हात झटकताना तेव्हढ्याच त्वेशाने पुट्पुटा ............ .( खड्ड्यात जाउदे कंपनी.....)
कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल

हळदी कुंकू - पण राजकीय

आपल्या नवऱ्यांची भांडणं असोत किंवा मतभेद असोत, बायकांनी मात्र त्या भांडणांची सावली आपल्यावर पडू देऊ नये असं ठरविले. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील रथी-महारथी, आघाडी-युती, लातूर-बारामती या सगळ्यांच्या बायका एकत्र आल्या आणि त्यांनी हळदी-कुंकवाचा जंगी कार्यक्रम केला. हसणं, खिदळणं, खाणं, गप्पा असा कार्यक्रम धमाल रंगला. आणि मग कोणीतरी टूम काढली नाव घेण्याची. अर्थातच नाव घेण्याचा पहिला मान मुख्यमंत्र्यांच्या बायकोचा. त्यामुळं सगळ्यांनी आग्रह करून मिसेस सत्वशीला चव्हाणांना खुर्चीवर बसवलं आणि उखाण्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. दिल्लीत राहून असल्या कार्यक्रमांचा खरं तर त्यांना विसर पडला होता; परंतु नवऱ्याचा आदर्श बाळगून त्यांनी लगेचच इथल्या वातावरणाचा सराव करून घेतला. घसा साफ केला आणि नाव घेतलं-


इथली थंडी अशी तशीच, दिल्लीत थंडी जोरात
बिल्डर आला दारात, की पृथ्वीराज घुसतात घरात

अर्थात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मुख्यमंत्र्यांच्या बायकोच्या पाठोपाठ उखाणा घेण्याचा आपला हक्क मिसेस भुजबळ किंवा मिसेस आबा यांनी हिरावून घेऊ नये म्हणून अजितदादांच्या बायकोनं चपळाई केली आणि खुर्ची गाठली. सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. आणि शांतता होताच सुनेत्रा पवार यांनी उखाणा सुरू केला-

वाट पाहायची हद्द झाली, कित्ती कित्ती वाट पाहिली
अजितरावांची आता फक्त एकच पायरी राहिली

काँग्रेस आणि राष्ट्रवादी झाल्यावर आता भाजपाला संधी मिळाली पाहिजे, असा विचार करीत प्रज्ञा मुंडे यांनी खुर्चीकडे धाव घेतली; परंतु त्याआधीच नीलम राणेंनी खुर्चीचा ताबा घेतला होता. त्यामुळं त्यांना बाजूला उभे राहावे लागले. नीलमताईंनी चारी बाजूला नजर वळवून एखाद्या फलंदाजानं फिल्डिंगचा अंदाज घ्यावा तसा अंदाज घेतला आणि मग खणखणीत आवाज लावला-
समुद्रावर वारा सुटला की नारळ-सुपारी आनंदानं झुलते
अहो मुख्यमंत्री म्हटलं की नारायणरावांची कळी खुलते

नीलमताई डौलात उठल्या आणि प्रज्ञा मुंडे खुर्चीवर बसल्या. मिसेस गडकरींनी कान टवकारले आणि त्या खुर्चीच्या जवळ सरकल्या. प्रज्ञा मुंडेंनी उखाणा घेतला-

अंगात जाकिट, खिशात पाकिट, अंगठीत  चार  खडे
गोपीनाथराव, तुम्ही धीर नका सोडू गडे

चारही बाजूंनी या उखाण्याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि कांचन गडकरींनी खुर्चीत पटकन् स्वत:ला झोकून दिलं. वैदर्भी अघळपघळ स्वभावानुसार त्यांनी थेट उखाणा सुरूही केला-

नाश्त्याला वडे, जेवणात खीर, दुपारी भेळ, रात्री हॉटेलात जाऊ
तरी नितीनराव म्हणतात, सांग- मधल्या वेळेत काय खाऊ?

पुढे जाऊ की नको अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या आर. आर. आबांच्या बायकोला मीनाताई भुजबळांनी हातानं धरून आणलं आणि खुर्चीवर बसवलं. मग सुमन आबा पाटील यांनी जरा संकोचत संकोचत उखाणा म्हटला-
कुणी म्हणतं हाटेल, आन कुणी म्हणतं ढाबा
सासरी आल्यावरच कळलं, नवऱ्याला म्हणत्यात आबा

या उखाण्यानं सगळीकडेच एकच जल्लोश झाल्यावर चहासाठी कमर्शियल ब्रेक जाहीर करण्यात आला.
’ ’
ब्रेकनंतर सगळ्यांचं स्वागत वगैरे झालं आणि आबांच्या बायकोने भुजबळांच्या बायकोला खुर्चीवर बसवीत फिट्टंफाट करून टाकली. मीनाताई भुजबळांनी मनातल्या मनात भुजबळांचा धावा केला आणि नाव घेतलं-

नव्या जमान्यात, नव्यानं लिहिली पाहिजे आता एबीसी
छगनरावांच्या बाराखडीत पहिली अक्षरं ओबीसी

मीनाताई उठून राष्ट्रवादींच्या बायकांत जाऊन बसल्या तोवर रश्मी ठाकरेंनी खुर्ची गाठली. त्याचवेळी शर्मिला ठाकरेही तिथं पोचल्या. दोघींमध्ये जणू संगीत खुर्चीची स्पर्धा लागली. परंतु वैशाली देशमुख पुढे सरसावल्या आणि शर्मिलाला म्हणाल्या, ‘अगं, ती मोठी आहे तुझ्यापेक्षा.. तिचा मान पहिला.’ शर्मिलाकडे विजयी मुद्रेने पाहत रश्मीताईंनी खुर्चीवर बसत उखाणा सुरू केला-

कधी कधी बघतात माझ्याकडे ते अशा काही चेहऱ्यानं
उद्धवरावांचा काढते फोटो, मी हृदयाच्या कॅमेऱ्यानं

रश्मीताईंच्या उखाण्याला मिळालेली दाद पाहून शर्मिला ठाकरेंवरची जबाबदारी वाढली. त्यांनी साडीचा पदर कमरेला खोचत पोज घेतली आणि उखाणा मारला-

मराठीत म्हणतात पाच, त्याला इंग्रजीत म्हणतात फाइव्ह
सगळ्यांची भाषणंडेड फक्त राजचंच भाषणलाइव्ह

वातावरणात राजकीय ताण संपला. खेळीमेळीनं सगळं सुरू होतं. ते पाहून वैशाली देशमुखही मोकळ्या झाल्या. त्यांनी आग्रहाची वाट पाहता खुर्चीवर बसत नाव घेतलं-
सदा मेला टकामका बघतो, एक नंबरचा चोंबडा
कोण म्हणता? अहो, विलासरावांच्या केसांचा कोंबडा!

हास्याची लकेर सर्वत्र उमटली. अशोकराव चव्हाणांची बायको मराठीत उखाणा घ्यायला संकोचत होती. वैशालीताई म्हणाल्या, ‘अगं, इंग्रजी चालेल!’ मग त्या उठल्या-
आऊट ऑफ टेन, एकसारखे असतात नाइन
यू डोंट वरी, नाऊ अशोकराव इज फाइन

मिसेस चव्हाणांच्या या खुलाशानंतर सगळ्यांनी मिळून आग्रहानं प्रतिभा पवारांना खुर्चीत बसवलं. त्यांनीही सगळ्यांचा मान ठेवला-
बारा कोस बारामती, दहा कोस वाई
शरदरावांचं नाव घेते, सुप्रियाची आई

इथंसुद्धा त्यांनी मुलीला प्रमोट केलं.. अशी कुजबूज यावर अजितदादांच्या बायकोनं केली.
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥