Showing posts with label jokes. Show all posts
Showing posts with label jokes. Show all posts

Sunday, December 29, 2019

Pune Jokes - अचाटबुध्दी संपन्न पुणेकर


😜 अचाटबुध्दी संपन्न पुणेकर ! 😜
*****
पुण्यात विकल्या जात असलेल्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्यं असावेच लागते.

😜 खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण . .
‘आमचे येथे रसाळ खजूर मिळतील’
हे फक्त पुण्यात !

😜 एरवी जर्दाळू सगळीकडे ..
पण “पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात !

😜 केशरात ‘असली’ केशर फक्त पुण्यात.

😜 सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या
भारतात असली ..तरी ‘वेलचीयुक्त चहा’ ही पाटी फक्त पुण्यात दिसते.

😜 परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली -
‘गणपती कारखाना’ पण तेच पुण्यात बघितले तर
“आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मुर्ती मिळतील”!

😜 एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना
“चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतिच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट” अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेनं दुकानात शिरलो. उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहीलाय की काय?

चौकशी अंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबानं मजकूरात बदल नाही.

😜 शनिपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा मजकूर वाचून मी कोलमडायच्याच बेतात होतो..
ती पाटी म्हणजे “येथे टिकाऊ आणि दर्जेदार जानवीजोड मिळतील” !!!!

😜 आणि अजुन एक ..
"आमच्याकडे दणकट पायजमा आणी मुलायम बंडी मिळतील" अशी ही पाटी होती.

पुण्यात याची देही याची डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या

😜 येथे खास मालवणी पद्धतीने बनवलेले ओरिजनल चायनीज मिळेल.

पुढील अजुन कहर...

😜 येथे सेकंडहॅंड कवळ्या स्वस्तात मिळतील !!!!

😜 येथे गेलेल्या फटाक्यांना वाती लाउन मिळतील !

Climax ...

😜 एका दुकानात "येथे वैकुंठालंकार मिळतील"
असे लिहिले होते. मी उत्सुकतेने पाहिले की काय असेल तिथे तर काय सांगू!

अंत्यविधीला लागणा-या सामानाचे ते दुकान होते

अचाट बुध्दीचे धनी असणाऱ्या सर्व पुणेकरांना समर्पित!

Wednesday, July 8, 2015

Start the morning with a joke :)



As always click on the images to get a bigger size and download.

Thursday, May 31, 2012

Marathi jokes (katta)


शिक्षक : एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २ भिंती बांधायला किती खर्च येईल? 
विद्यार्थी : १०० करोड. 
शिक्षक : नालायकतुझ्या बापाच नाव काय? 
विद्यार्थी : सुरेश कलमाडी.
----------
 
Psychology 
चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली .उंदीर लगेच केककडे धावला . सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली , पुन्हा तोच प्रकारसरांनी पदार्थ बदलून पहिले , उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला. 
सर : यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही. 
एवढ्यात पक्क्या ओरडला , "सर , एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना ." 
------------
 
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले , "अगं , आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतातकुठं गेलं ते पोरटं ?"पत्नी : कमाल आहे तुमच्या अविचारीपणाचीत्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता ? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेनगोपाळराव : तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीसकारण त्यात ...अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत .
----------
 
लाईट आल्यावर खोलीतील देशस्थ आणि कोकणस्थ कसा ओळखावा ? 
लाईट आल्यावर "आले " म्हणून आनंदाने चित्कारतो तो देशस्थ , ... आणि जो लगेच मेणबत्तीवर फुंकर मारतो तो कोकणस्थ. 
----------
 
शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवलापण गाढव पाणीच प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलातचिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो . 
----------
 

वडील : अरेएक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूधपाव आणि अंडी घेऊन यायचो .मुलगा : आता ते शक्य नाही , बाबाआता तिथे सीसीटीव्ही बसवलाय! 
----------
 
रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता , लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेलाम्हणून यम स्वतः दारात उभा होता ,यमाने रजनीकांतला लगेच ओळखला, 
यम : तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे. 
रजनीकांत (मस्करीत ): नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ . 
यम ( गोंधळून): अरे चित्र्या , टायटानिक बुडाली होती कि जळाली होती ? 
----------
 
वडील : मुलायशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि Autograph मध्ये बदलतेमुलगा : नाही बाबायशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि chevas regal किंवा black label मध्ये बदलते.

Sunday, March 20, 2011

घटना (Ghatana) - दॄष्टीकोन

घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.

Friday, March 11, 2011

Molkarin joke

मालकिन: काय ग... 3 दिवसांपासून कामाला नाही आलीस, तेहि न सांगता?

मोल्करिन: ओ Madam... facebook वर status update करून गेले होते की गावाला जाते म्हणून.. साहेबांनी comment पण दिली की "Come soon... Miss U!!"

Wednesday, March 9, 2011

Wife control (Joke)

God comes and says :-
 
"I want the men to form two queues, one line for the men who had control over their women, and the other one for the men who were controlled by their women. Also, I want all the women to go away so that no man and woman can talk.

 Next time God comes back, the women are gone, and there are two lines.
The line for the men who were controlled by their women is 100 miles long, and
in the line of men who had control over their women there is only one man.
 
God gets mad and says,
"You men should be ashamed of yourselves. I created you in my image, and you were all controlled by your mates. Look at the only one of my sons who stood up and made me proud.  Learn from him!"

"Tell them, my son, how did you manage to be the only one in this line?"

 The man replies,
 
 "I don't know, my wife told me to stand here.

Tuesday, December 28, 2010

Bandya (marathi joke)

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?
 
बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.

 
हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???

...

बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥