Showing posts with label choti kavita. Show all posts
Showing posts with label choti kavita. Show all posts

Sunday, December 29, 2019

School Exams - Athwani - शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!

"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!

"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!

पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..

"संदर्भासहीत स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

"कवितेच्या ओळी पुर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!

"निबंध लिहा", किंवा "गोष्टं लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!

तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनीj आठवली...
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!

Friday, July 10, 2015

Marathi kavita: Bayko

बायको.....!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!
तिचे अस्तित्व हवे असते
सकारात्मक खलबतांसाठी..!
बायको म्हणजे बंदर असते
नवरा नावाच्या गलबतासाठी..!!
संसारातील जिवनसाथीसाठी
शोधाशोध नात्यांच्या डेऱ्यांसवे..!
बायको नावाचा शाश्वत आधार
मिळतो सप्तपदीच्या फेऱ्यांसवे..!!
सर्वांच्या आनंदासाठी
ती साथ देणारी सावली असते..!
दुखऱ्या क्षणी सावरायला
बायको नावाची माउली असते..!!
गंध सुखाचा अनुभवणारा
घरात सर्वांचा ताफा असतो..!
कुटुंबात दरवळणारा
बायको नावाचा चाफा असतो..!!
कर्तव्याच्या करारावरची
ती न पुसणारी शाई असते..!
प्रत्येकाची आवड जपणारी
बायको नावाची घाई असते..!!
आजारपणात फणफणणाऱ्या
ती लेकरांसाठी धट्टी असते..!
कपाळावरील मिठाची
बायको नावाची पट्टी असते..!!
स्वयंपाक, धुणे,दळणकांडप
तिचे राब-राबणारे हात असतात..!
प्रसंगी शिळेपाके चावणारे
बायको नावाचे दात असतात..!!
सर्व दुःखांना स्वतःमध्ये
ती मळणारी उंडी असते..!
जन्म दिलेल्या फुलझाडांसाठी
बायको नावाची कुंडी असते..!!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!

Thursday, July 9, 2015

About Husbands

जरा बऱ नसेल तर नवरे
कित्ती मदत करतात,

तु झोप आता म्हणून
दहा वेळा उठवतात.

चहा कशात आहे,
साखर संपलीये का,
 गाळणं कुठाय?

सगळे डब्बे ओट्यावरच
मुक्कामाला येतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

टेबलावरची वर्तुळ सांगतात
किती झालाय चहा,

आवरणारे म्हणतात
तू झोपुनच रहा,

फडके म्हणुन नवाकोरा
नॅपकीन ही घेतात.

जरा बऱ नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

दुध जातंच ऊतु
जरी केलं 'वर्क फ्रॉम होम'
आणि ऑफिसला गेले तर
फोन वर फोन.

चौकशीच्या नादात
बायकोची झोप विसरतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

खरकटी भांडी आणि
पिम्पाखाली तळे,

कुकरच्या अगणित शिट्या
आणि पोळी भाजीची पार्सले.

यांच्या दर्शनानेच बहुदा
आजारपणे पळतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

रागावू नका, एखादा नवरा
असेलही जगावेगळा.

सन्माननीय अपवादांनी
स्वतःला वगळा.

पण असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात

कि पलीकडचे रंग
जरा जास्तच हिरवे दिसतात.
 म्हणे नवरे मदत करतात??

Wednesday, July 8, 2015

Shala aani college


शाळा : म्हणजे गणवेश, नीटनेटकेपणा.....

काॅलेज : म्हणजे कसाही अवतार
आणि स्टाईल.....



शाळा : पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन,
पट्टी.....

काॅलेज : एक बॉलपेन तो पण
मित्राकडून घेतलेला......



शाळा : वर्गात येण्याआधी "टीचर, मे आय कम इन..?" किंवा "टीचर, मी आत येवू का...?"

काॅलेज : वर्गाजवळ येणार, किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.



शाळा : सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार...!

काॅलेज : मित्राला बोलणार "अरे यार एक पेज तर दे ना".



शाळा : पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार, काय स्कॉलर आहे हा यार.

काॅलेज : फ्रेंड्स बोलणार "काही येत
नाही त्याला म्हणून निघालाय".

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते.

काॅलेज : उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : म्हणजे व्यवस्थित पाठांतर.

काॅलेज : म्हणजे नुसता रट्टा.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : म्हणजे मजा, मस्ती, धमाल.

काॅलेज : म्हणजे जस्ट चिल यार.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शाळा : यार, मला ती आवडते.

काॅलेज : सांभाळून बघ रे वहिनी आहे........
miss you my all sweet friends

Saturday, October 22, 2011

Marathi Charoli आठवणी

आठवणी सांभाळणं खूप सोपं असत,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात,
पण क्षण संभाळण खूप कठीण असत,
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात.

Saturday, May 28, 2011

Maitri

ही ""मैत्री"" .
कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....
...अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....
मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!!

Saturday, May 14, 2011

Sindhu tai sakpal hyaane kaahi khupte tithe gupte war mhantlelya goshti

Sudhir bhatanchi ek kavita tyaan ne mhantlya -
ghetala mi shwas jevha kanth hota kapalela
polalela pran majha bolanya adhich gela
jivanachi pretyatra thambali jevha smashani
ghetala kadhun khanda olakhichya manasani
Ani kahi changali wakye ji hyat sindhutai mhanalya :-
Deva malahasayala shikaw
Amhi kadhi radalo hoto hyacha wisar padu deu nako

Jab who aye to cheharepe rakhrakhaw tha
Magar wo nahi dekh sake jo mere dil ka ghav tha
Ajun baryach kaahi hotya.. jamlyas shrotyaan ne comments madhye lihaawya.. :)

Tuesday, April 26, 2011

Ek Chotishi Kavita

“ओढ" म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते स्वत: केल्याशिवाय समजत नाही.
"पराजय" म्हणजे काय ते शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही.
"दु:ख" म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥