Lyrics Jeevanat hee ghadi - Kamapurta Mama
गीत - जीवनात ही घडी
चित्रपट-कामा पुरता मामा (१९६५)
गीतकार - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - लता मंगेशकर
Lyrics :- जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे
रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे
हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविणका अर्थ वेगळा
स्पशार्तून अंग अंग धूंद होऊ दे
पाहू दे असेच तुला नित्य हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे