Sunday, September 9, 2012

Aathwani poem

दहावीच्या माझ्या वर्ग मित्रांना काय हि कविता आठवते ?

आई एक नाव असत, घरातल्या घरात गजबजलेल गाव असत ,

सर्वात असते तेव्हा जाणवत नाही ,
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही .

जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत
उमाळे दाटतात .

आई मना मनात तशीच जाते ठेऊन काही
जीवाचं जीवाला कलावं असं जाते देऊन काही .

आई असतो एक धागा वातीला उजेड
दावणारी समयीतली जागा .

घर उजळत तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात कि सैरा - वैरा
धावायलाही कमी पडत रान !

पिक येतात जातात , माती मात्र व्याकुळच
तिची कधीच भागत नाही तहान
दिसत काहीच नसत डोळ्यांना
तरी खोदत गेलो खोल -खोल
कि सापडतेच अन्त्कार्णतली खान .

याहून काय निराळी आई ?
ती घरात नाही ? तर मग कुणाशी बोलतात
गोट्यातील हम्ब्रानार्या गायी ?

आई खरचं काय असते ?
लेकराची मे असते
वासराची गाय असते
दुध वरची साय असते
धरणीची ठाय असते.

आई I असते जन्माची शिदोरी
सरतही I नाही
उरतही नाही !

आई एक नाव असते
घरातल्या घरात
गजबजलेल गाव असते !