Tuesday, December 28, 2010

Nakki wacha (Marathi Lekh)

    हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी

    आणि लग्न होणार असलेल्यांनी .......

    नक्कीच वाचा: विचार करा.


    एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
    जेवताना मी तिचा हात हातात
    घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."


    तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
    तरीही ती शांतपणे जेवत होती,
    सगळे शब्द जुळवून मी तीला  सांगितलं,
    मला घटस्पोट हवाय."


    तिने शांतपणे विचारल,- "का?"


    तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
    समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
    लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
    हे तिल जाणून घ्यायचं  होत;
    पण माझं मन दुसऱ्या  स्त्रीवर आलय हे मि तिला
    स्पष्टपणे सांगू  शकत नव्ह्तो.

    माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
    पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.



    दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
    तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
    या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
    तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
    आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
    तिची आणखी एक अट होती.
    लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
    त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
    मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.


    घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.
    मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
    बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.


    दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
    आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
    नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
    आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,
    असा प्रश्न पडला.
    त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
    रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
    हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.


    दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन 
    माझी काळजी वाढवत होत.  पण तिच्या अटीच
    पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय  याची कल्पना
    नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.


    आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
    जी परत आयुष्यात येत होती.


    महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.  माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.
    ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
    नव्हते.  माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
    मी वेगाने CAR चालवत घरी आलो. 
    माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
    हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
    मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
    माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
    जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.


    पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
    महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.