Thursday, June 4, 2009

Lyrics Lek Ladaki/Ladki Ya Gharachi (लेक लाडकी या घरची)

चित्रपट : कन्यादान
गायिका : लता मंगेशकर

लेक लाडकी या घरची,
होणार सून मी त्या घरची || ध्रु ||

सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली
कळी कळी फुलून, ही चढते मंडपी, वेल मायेची || १ ||

संपताच भातूकली, चिमुकली ती बाहुली
आली वयात खुदूखुदू हसते होऊनी नवरी लग्नाची || २ ||

हे माहेर, सासर ते, हि काशी रामेश्वर ते
उजळीते कळस दो घरचे चंद्रिका पूर्ण चंद्राची || ३ ||