Thursday, May 28, 2009

अव हे गाव लई न्यार (छबिदार छबि मी तोर्यात उभी)

चित्रपट : पिंजरा (१९७२)
गीत : जगदीश खेबुडकर
संगीत : राम कदम
गायिका : उषा मंगेशकर
गायक : सुधिर फडके

गायिका :
अव हे गाव लई न्यार हिथ घाट गार वार
ह्याला गरम क्षिनगार सोसना
कोरस : ह्याला गरम क्षिनगार सोसना

गायिका :
ह्याचा अधाशाचा तोरा ह्याचा कागद हाय कोरा
हिथ शाहिरी लेखणी पोचना
कोरस : हिथ शाहिरी लेखणी पोचना

गायिका :
हिथ वरण भाताची गोडी र नको फुकट छेडाछेडी र
गायक : कावो
गायिका :
अहो सोंगा धोंगाचा बाजार हिथला साळसुद घालतोय आळिमिळी
गायक : बर
गायिका :
अन सार वरपती रस्सा भुरकती घरात पोळी अन भायेर नळी र

गायक :
अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू ह्याएस तरी कोन ?
गायिका : कोन ?
गायक : व्हय व्हय कोन ?

गायिका :
छबिदार छबि मी तोर्यात उभी …(२)
जशी चांदणी चमचम नभी
अहो दाजिबा गावात होइल शोभा हे वागण बर नव्ह …(२)
कोरस : अहो दाजिबा गावात होइल शोभा हे वागण बर नव्ह || ध्रु ||

गायिका :
डौल दावते मोराचा तिरपा डोळा चोराचा
वढ्याच्या काठाला आडिवतो अंगावर पानी उडीवतो
आर बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागण बर नव्ह …(२)
कोरस : अहो दाजिबा गावात होइल शोभा हे वागण बर नव्ह || १ ||

गायिका :
नवतीच रान हे भवतीन, फिरत आले मी गमतीन
बांधावरन चालू कशी , पाठलाग ह्यो मी टाळु कशी
आर लाजमोड्या , भलत्याच करतोयस खोड्या , हे वागन बर नव्ह …(२)
कोरस : अहो दाजिबा गावात होइल शोभा हे वागण बर नव्ह || २ ||

गायिका :
मिरचीचा तोरा मी करते र , वाट्यात एवज भरते र
पदर माझा धरतोस कसा , भवतीन माझ्या फिरतोस कसा
आर बत्ताश्या , कशाला पिळतोस मिशा , हे वागन बर नव्ह …(२)
कोरस : अहो दाजिबा गावात होइल शोभा हे वागण बर नव्ह || ३ ||

गायिका :
हिरवी शेत डवरली , टपोरी कणस मोहरली
शीळ घालुनी करतोस खुणा, घडीघडी हा चावटपणा
आर जा मर्दा, अब्रुचा होईल खुर्दा , हे वागन बर नव्ह …(२)
कोरस : अहो दाजिबा गावात होइल शोभा हे वागण बर नव्ह || ४ ||

Click here for English version of this lyrics.