Monday, April 20, 2009

Lyrics Sasa to kasa ki kapus jasa

ससा तो ससा की कापूस जसा 
त्याने कासवाशी पैज लावीली
वेगेवेगे धावू नी डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नी कासवाने अंग हलिवले
ससा जाई पुढे नी झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहीयले 
वाटेत थांबलेना कोणाशी बोललेना 
चालले लुटुलुटु पाई....... ससा

िहरवी िहरवी पाने नी पाखरांचे गाणे
हे पाहुिनया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा िनवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
िमटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे 
झाडाच्या सावलीत झोपे........ससा

झाली सांज वेळ तो गेला िकती काळ
नी शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नी धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
"िनजला तो संपला" सांगे......ससा