Wednesday, April 22, 2009

Lyrics Rima jhima dhuna (Garava)

रिमझिम धून, आभाळ भरुन
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ? ||

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून...(2) || 1 ||
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ? ||


गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला...(2)
सांगावे काय माझे मला(2), उगाच मनात बावरुन || 2 ||
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ? ||


वार्यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे...(2)
मनाच्या वार्यात आता(2), सुरात तुला मी कवळून || 3 ||
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ? .....(2)||

येणार हे कोण ? .....(4)

Check other lyrics at Complete Lyrics Of Garava