Monday, April 27, 2009

Lyrics Phite/Fite andharache jale

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश 
दरी खोर्यातुन वाहे एक प्रकाश प्रकाश ||
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश ....

रान जागे झाले सरे पायवाटा जाग्या झाल्या ...(२)
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या,
एक अनोखे लावण्य आले भरास भरास || १ ||
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश ....