Saturday, November 13, 2021

वर्क फ्रॉम ऑफिस

 वर्क फ्रॉम ऑफिस 🏢

प्रवेश १:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल.

ही💁‍♀️: अरे बापरे! म्हणजे आपल्याला भांडी, केर, लादी करायला बाई शोधायला लागेल...

मी💁‍♂️:.....😟

प्रवेश २:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल

ही💁‍♀️: चला, म्हणजे आता घरात थोडी तरी शांतता असेल!

मी💁‍♂️:.......🤔

प्रवेश ३:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल

लेक👱‍♀️: य्ये!!! म्हणजे आख्खा नेट पॅक मला वापरता येईल

मी💁‍♂️:.......😊

प्रवेश ४:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल

आई👵: म्हणजे आता केव्हाही कुकर, मिक्सर लावून चालेल.

मी💁‍♂️:......😏

प्रवेश ५:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल

ही💁‍♀️: डबा नेणार नसशिलच. बाहेरचं चरायला आवडतं ना!!

मी💁‍♂️:......😵‍💫

प्रवेश ६:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल

ही💁‍♀️: चला, म्हणजे निदान आता तरी रोजच्या रोज दाढी करशील!

मी💁‍♂️:......👨🏻

प्रवेश ७:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल

ही💁‍♀️: बसवेल का एवढा वेळ ऑफिसात? घरी दर अर्ध्या तासाने लोळतोस!!!

मी💁‍♂️:.....😡

प्रवेश ८:

मी💁‍♂️: बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम ऑफिस सुरू होईल

ही💁‍♀️: यापुढे उशीर होणार असेल तर "खूप काम होतं" अशी थाप आता मारू नकोस. किती काम असतं ते पाहिलंय आम्ही.

मी💁‍♂️:......😫