लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतो. काही जणांची कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेष' कल्पना असते. एकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतो. संवाद ऐका बरं " अरे यार चार चार ऑफिसर आहेत बँकेत पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो." "का? बाकीचे काही काम करत नाहीत?" मी विचारले... "काही काम करत नाहीत रे ...आणि आमचा म्यानेजर पण काही बोलत नाही ." एकूणच माझ्या या मित्राला बँकेत केवळ हमी एकटाच कामाने मारतो आहे असे वाटत होते . " मी एक उपाय सुचवू का ?" मी विचारले . " तीन आठवडे सुट्टी घे" मी म्हणालो. "सुट्टी घेऊन काय करू? उगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस. " तो डाफरला .
"तीन आठवडे सुट्टी घे. घरी पडे रहो कर. लायब्ररी मधून फिल्म च्या सी डीज आण , पुस्तके वाच. पण या तीन आठवड्यात एक काम करायचे ...ते म्हणजे एकदाही बँकेच्या जवळपास ही जायचे नाही. " "त्याने काय होईल?" "तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास तरी बँक चालू राहिली. बंद पडली नाही . तुझ्या एकट्या मुळे बँक चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ " माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाही. आपल्यामुळे ऑफिस चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात.
माझे एक परिचित आहेत. कधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावे. दर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहकार्याला फोने करून "काय रे काय चालले आहे ?" असे म्हणून पिडत असतात. आपल्या पाठीमागे ऑफिस मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड . म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाही. असुरक्षितातेची भावना हे पण काही जणाच्या सुट्टी न घेण्या मागचे कारण असू शकते .
पाश्चात्य देशातील काही चांगली व्यवस्थापन तत्त्वे आपण उचलली पाहिजेत . तिथे सुट्ट्या कमी असल्या तरी त्या घेतल्याच पाहिजेत असा दंडक असतो . रजा विकणे ,साठवून ठेवणे , पेन्शनीत वर्ग करणे असले प्रकार नसतात . माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्या साठी रजा ही घेतलीच पाहिजे असा स्पष्ट आग्रह तिथे असतो .आपले म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी त्यांच्या सोयीच्या आणि पगार जास्तीत जास्ती वसूल कसा करता येईल अशाच गोष्टी उचलल्या आहेत बाकीच्या नुसत्या गप्पा. नारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असते. त्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जा, कुटुंबासाठी वेळ काढा , इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे.आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात हो" म्हणून त्यांचे कौतुक करतो. आणि निदान रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो.
सांगायचा मुद्दा काय की आपण काही तरी लंगड्या सबबी सांगून रजा घेण्याचे टाळतो . कुटुंब आणि स्वतःला जो वेळ द्यायचा तो देत नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला आहे ते कळत नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागवत राहतो. रागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असते. चिडलेला, थकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....आयुष्याचे संगीत शोधा...जगण्याची प्रेरणा शोधा...ऐका...एक सुट्टी घ्या... Ugichch
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Wednesday, August 8, 2012
Kaahi Wichar - Marathi Thoughts for life
बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तूकाय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली.त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामेव्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!
कुठलंही काम, प्रॉजेक्ट, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातातघ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊनका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषीस्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा.
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.

दोन तत्त्वं :
"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात "
Tuesday, August 7, 2012
Tujhya wina/vina lyrics - तुझ्या विना - Mumbai Pune Mumbai
तुझ्या विना (Shabda)
तुझ्या विना.... तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना....
भास का हा तुझा होतसे मला सांगना
लागते ओढ का सारखी अशी सांगना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
भास का हा तुझा होतसे मला सांगना
लागते ओढ का सारखी अशी सांगना
झाले अनोळखी माझी मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
उमझून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांगणा जीव हा गुंतला
झाले आता जरी
होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांगना
तुझ्या विना.... तुझ्या विना....
तुझ्या विना.... तुझ्या विना....
(वैशाली सामंत:)
वाट होते माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली..
फिरुनी पुन्हा नवे
नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांगना

Marathi song lyrics: Ka kale na (mumbai pune mumbai)
उमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे
एक मी एक तू शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू , सत्यात तू , साऱ्यात तू
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे
घडले कसे कधी कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठावरी
दे न तू साथ दे
हातात हात दे
नजरेतना नजरेतुनी इकरार दे
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे