Monday, April 20, 2009

Lyrics shalu hirawa pachu ni marawa

शालू हीरवा पाचू नी मरवा वेणी तीपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा
मोऱ्या भाळी चढावा जाळी नवरत्नान्ची माला
साजणी बाई येणार साजण माझा ||

चुल बोळ्की इवली इवली भातुकलीचा खेळ ग
लुटुपुटुच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशमी धागे ओढ़ती मागे व्याकुळ जीव हा झाला
साजणी बाई येणार साजण माझा ||१||

सुर गुम्फिते सनई येथे झडे चौघडा दारी
वाजत गाजत घोड्यावरुनी येइल आता स्वारी
मी वरमाला घालीन त्याला मुहुर्त जवळी आला
साजणी बाई येणार साजण माझा ||२||

मंगल वेळी मंगल काळी डोळा का ग पाणी
साजण माझा हा पतिराजा मी तर त्याची राणी
अंगावरल्या शेलारीला बान्धीन त्याचा शेला
साजणी बाई येणार साजण माझा ||३||
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥